‘छावा’ पाहिला अन् ‘या’ किल्ल्यावर अफाट गर्दी जमली: खजिन्याच्या शोधात कुदळ, फावडे घेऊन…; Video Viral

नुकताच अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. मात्र या चित्रपटाशी संबंधित एक विचित्र अशी बातमी समोर येत आहे. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघलांचा खजिना लुटला होता. नेमका याच मुद्द्यावरून मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यावर(fort) हजारो नागरिक दाखल झाल्याची घटना घडली. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथील किल्ल्यावर(fort) खजिना शोधण्यासाठी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. बुऱ्हाणपूर किल्ल्यावर हजारो नागरिक फावडे आणि ककुदळ घेऊन आले होते. काही जण आधुनिक यंत्रणा देखील घेऊन आले होते. त्याआधारे किल्ल्यावर आणि शेजारील शेतामध्ये खोदकाम करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जवळपास त्या ठिकाणी त्या नागरिकांनी शेकडो खड्डे खोदले आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नागरिकांनी किल्ल्याच्या परिसरात तळ ठोकला आहे. बुऱ्हाणपूर येथील असीरगडच्या आसपासच्या भागात खजिना असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर या भागात नागरिकांनी गर्दी केली होती. येथील मजुरांना शेतात काम करताना सोन्याची नाणे सापडली होती. त्यामुळे या अफवेला जास्त ताकद मिळाली.

संध्याकाळच्या सुमारास नागरिक हातात फावडे, कुदळ घेऊन व चक्क मेटल डिटेक्टर घेऊन खजिना शोधण्यासाठी दाखल झाले. पाहता पाहता त्या ठिकाणी लोकांनी 100 पेक्षा जास्त खड्डे खोदून टाकले. या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी प्रशासन सतर्क झाले. व घटनास्थळी धाव घेतली. छावा सिनेमातील लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी मुघलांचा खजिना दडला असल्याची अफवा पसरली आणि हजारो लोक या परिसरात दाखल झाले.

छावा सिनेमात बुऱ्हाणपूर येथील लुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या प्रमाणे आजही त्या ठिकाणी हा खजिना असेल या शक्यतेने लोकांनी या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मध्ये प्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथे मुघलांची मोठी छावणी होती. औरंजेबाचे हे सर्वात आवडते शहर असल्याचे म्हटले जाते. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे मुख्य शहर अशी या शहराची ओळख होती. सागरी मार्गाने यानेऱ्या वस्तू बुऱ्हाणपूर मार्गे दिल्लीकडे जात असत असे म्हटले जाते. त्यामुळे आता बुऱ्हाणपूर व असीरगड किल्ला परिसरात हजारो लोक खोदकाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीचे दरही नरमले

एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का; तब्बल 250 कर्मचाऱ्यांची ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत ‘घरवापसी’

दररोज न चुकता आवळा खाल्ल्यास 6 आजार होतात छुमंतर; आयुर्वेदातील रामबाण उपाय