स्कॅमरचा नवा कारनामा: सरन्यायाधीशांच्या नावाने पैसे मागितले; सायबर पोलिसांनी उचलली कारवाई

देशात सायबर(Cybercrime) गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सायबर ठग सतत नवनवीन युक्त्या शोधून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. आता, सायबर गुन्हेगारांनी थेट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून फसवणुकीचा नवा प्रकार केला आहे.

दिल्लीतील काही नागरिकांना स्कॅमरने सरन्यायाधीश असल्याचा दावा करत मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये स्कॅमरने म्हटले होते की, “मी सरन्यायाधीश आहे. कॉलेजियमबरोबर एक महत्त्वाची बैठक आहे, पण मी कनॉट प्लेसमध्ये अडकलोय. मला कॅबसाठी ५०० रुपये पाठवू शकता का? मी न्यायालयात पोहोचताच तुमचे पैसे परत करेन.” यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम पसरला.

सरन्यायाधीशांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई करत गुन्ह्याची नोंद घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे.

भारतामध्ये सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. सरकारने देखील सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना लागू करण्याची गरज आहे.

हेही वाचा:

उठताना आणि बसताना वारंवार पाठदुखी-कंबरदुखी जाणवते? मग, ‘या’ योगासनांचा दररोज करा सराव

दिनेश कार्तिक लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दक्षिण सुपरस्टार्सचे नेतृत्व करणार

निक्कीच्या वागण्याने अरबाजला त्रास; डीपी दादाची समजूत – ‘स्वतःवर नियंत्रण ठेवा…’