भयंकर संडासच्या भांड्यात डोकं अडकलं थोडक्यात बचाव Viral Video

सोशल मीडियावर नेहमीच धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. (escape)अनेकदा इथे अशा काही घटनाही शेअर केल्या जातात ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आताही इथे असेच काहीसे घडले आहे. सध्याच्या हा व्हायरल व्हिडिओ नक्कीच तुमचे होश उडवेल. यात एका तरुणीने चपळतेने घरात घुसुन एका वृद्ध महिलेवर हल्ला चढवल्याचे दिसून आले आहे. यातील दृश्ये इतकी धक्कादायक आणि थरारक आहेत की ती पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या घटनेत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर तुम्ही अनेकदा ही गोष्ट पाहिली असेल की आपल्या घराजवळून अनेक लोक वावरत असतात किंवा आजूबाजूने जात असतात. मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच बऱ्याचदा काही अनोळखी व्यक्ती आपल्या घरात काही खोटं कारण सांगून घरात घुसण्याचाहिने प्रयत्न करतात. आपण त्यांची मदत म्हणून त्यांना घरात घेतो खरे पण हे तुमच्या चांगलाच अंगलड येऊ शकतं.(escape) अनोळखी व्यक्तीला घरात घेणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल. ही घटना धक्कादायक असून लोक आता यातील दृश्ये पाहून हादरले आहेत.

काय आहे व्हिडिओत?

यात घडलं असं की, एक तरुणी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेच्या घरात घुसली. ही तरुणी वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथा मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली तेवढ्यात तिच्या मागोमाग ही तरुणी घरात घुसली आणि तिने महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला. तिचे गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने तरुणीने प्रथम काढून घेतले, यानंतर तिने महिलेला धमकावण्याचाही प्रयत्न केला. वयोवृध्द महिला प्रतिकार करत असताना या तरुणीने तिला ओढत बाथरूमच्या आत नेऊन (escape)महिलेचं डोकं संडासच्या भांड्यात कोंबले, वरून पाणी सोडले आणि मग गुदमरून महिला मारणार तेवढ्यात महिलेने आपले डोके मागे केले आणि तिच्याकडे सुटकेची याचना करू लागली. तुला सगळं सोनं देते असं म्हणत महिला तरुणीकडे याचना करू लागली मात्र तितक्यात तिला समोरची खिडकी दिसली जिला पाहताच तिने आपल्या बचावासाठी खिडकीतून उडी मारली.

हा सर्व प्रकार समोरच्या फ्लॅटमधील गॅलरीत उभ्या असलेल्या एका महिलेने पाहिला आणि तिने तात्काळ मुलांना याची माहिती दिली. यानंतर दोन तरुण घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दार तोडून वृद्ध महिलेचा जीव वाचवला. यानंतर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणीला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ  नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “चांगला चौप द्या या काळ्या म्हशीला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक नंबर भाऊ असेच जागरूक रहा”.

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव