सुरक्षा रक्षक ठरला देवदूत! चालत्या Express मधून उतरणे पडले असते महागात; व्हिडीओ Viral

देव तारी त्याला कोण मारी! जेव्हा वेळ आली नसते तरी स्वतः यमराज जरी आला तरी काहीच घडू शकत नाही. प्राण जाण्यास पण वेळेचं बंधन आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही Viral व्हिडीओ(video). Viral व्हिडीओमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे.

पण ही हानी होता होता वाचली आहे, याचे संपूर्ण श्रेय तेथील कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला जातं. हा सुरक्षा रक्षक वेळीच धावून आला नसता तर होत्याचं नव्हतं अगदी क्षणार्धात घडले असते. परंतु, त्याच्या धावत येण्याने आणि योग्य वेळी उपस्थित असल्याने जीवित हानी होता होता वाचली.
सदर प्रसंग मुंबईच्या बोरिवली स्थानकावरील आहे. चालत्या Express मधून उतरण्याची घाई जीवावर बेतली असती. हा बहुमूल्य जीव अगदी जाता जाता थोडक्यात बचावला आहे. रेल्वे स्थानकांवर अनेक अपघात होत असतात. अनेक अपघातांमध्ये अनेक मृत्यू होतात, तर काही अपघातांमध्ये मृत्यू टळतो हे तेथील देवदूतांमुळेच! अशा प्रसंगी उपस्थित व्यक्ती काहीना काही धाडस करून या प्रसंगात पीडित व्यक्तीला ओढून आणतोच आणि त्याला वाचवतो.
मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजच्या @RailMinIndia या X हॅण्डलवरून सदर व्हिडीओ(video) शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या Express मधून उतरण्याचा प्रयत्न करत असते. मुळात, ट्रेनच्या गतीच्या विरुद्ध बाजूने हे प्रयत्न केल्याने तिचा तोल जातो आणि महिला फलाटावर आदळते.
महाराष्ट्र के बोरीवली रेलवे स्टेशन पर एक महिला चलती ट्रेन से उतरते समय असंतुलित होकर गिर पड़ी। वहां मौजूद रेलवे सुरक्षाकर्मी ने तत्परता दिखाते हुए उसे बचा लिया।
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 9, 2025
कृपया चलती ट्रेन से चढ़ने या उतरने की कोशिश न करें।#MissionJeevanRaksha pic.twitter.com/6R8FALdD0d
हे दृश्य इतके भयंकर आहेत की तेथे कर्तव्यावर असणारा सुरक्षा रक्षक जर तिथे नसता तर दृश्य काही वेगळी असली असती. पण सुदैवाने, तेथे तो व्यक्ती उपल्बध होता. त्याने हे दृश्य पाहिले आणि कसलाही वेळ न दवडता. त्या महिलेच्या दिशेने तो पळत सुटला आणि फलाटावर पडलेल्या महिलेला रुळावर जाण्यापासून वाचवलं.
रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने इतरांना असे करण्यापासून बद्ध केले आहे. चालत्या ट्रेनमधून उतरणे टाळावे असे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार? अजित पवार अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करणार?
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलच्या नव्या प्रेमाची चर्चा? दुबईत ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत दिसला!
चिमुकलीचा गोव्यात नरबळी? शेजाऱ्याच्या घराबाहेर गाडलेला मृतदेह, घटनाक्रम हादरवणारा