पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी असं वक्तव्य का केलं?
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (दि. २० नोव्हेंबर)रोजी मतदान(political updates) होणार असून (दि. २३ नोव्हेंबर) रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडं अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. यातचं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं एक पत्र समोर आलं आहे.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर(political updates) एक व्हिडीओ पोस्ट करत पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे. तसंच आपण आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे. आपणही मला सहकार्य केलं. तुमच्या सुख आणि दुःखात देखील मी सहभागी झालो.
कोणताही धर्म आणि जात न पाहता मी आतापर्यंत मदत करण्याची भूमिका निभावली. पण तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक मी पाहील की नाही? हे इश्वरच ठरवेल. कारण पुढच्या निवडणुकीत मी असेन किंवा नसेन. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करतो की, रोहिणी खडसे या निवडणुकीत उभ्या आहेत. आपण मला जसं सहकार्य केलं तसं रोहिणी खडसे यांनाही सहकार्य करा, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी जनतेला घातली आहे.
महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. खरं तर राज्यात युती आणि आघाडीच्या राजकारण सुरु आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पहायला मिळणार असून, निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मोठी घोषणा करत आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!
‘तारक मेहता…’ मालिकेतील जेठालालनं धरली निर्माता असित मोदी यांची कॉलर
राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; ‘या’ प्रकरणात धाडली नोटीस
नयनताराला धनुषच्या टीमनं दिला 24 तासांचा अल्टीमेटम; तर नेटफ्लिक्सला धमकी