मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा
झटपट काय बनवायचे म्हणून अनेक महिला मुलांना मॅगी बनवून देतात. मॅगी अगदी काही मिनिटांत बनवून तयार होते. मात्र सतत मॅगी खाऊन अनेकांना कंटाळा येतो. तसेच मॅगी टिफीनमध्ये(Tiffin) दिल्यावर ती लवकर स्टिकी होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मॅगीची एक वेगळी आणि भन्नाट रेसिपी सांगणार आहोत.
लहान मुलांच्या टिफीनमध्ये(Tiffin) आणि स्नॅक्स म्हणून सुध्दा तुम्ही मॅगीचा डोसा बनवू शकता. हा डोसा बनवणे सुद्धा अगदी सोप्प आहे. विविध सामग्रीसह तुम्ही मॅगी डोसा पौष्टिक सुद्धा बनवू शकता.
साहित्य
मॅगी
तेल
जिरे
मिरची
कोथिंबीर
तीळ
तांदळाचे पीठ
रवा
टोमॅटो
कांदा
अद्रक लसूण पेस्ट
रेसिपी
मॅगीचा पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी मॅगी मिक्सरला मस्त बारीक करून घ्या. त्यानंतर या मॅगीमध्ये थोडा रवा आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. यामध्ये टोमॅटो, कांदा, मिरची, अद्रक लसूण पेस्ट सुद्धा मिक्स करा. तसेच चविनुसार मीठ मिक्स करून घ्या. या मिश्रणात तुम्ही जीरे, कोथिंबीर आणि तीळ सुद्धा मिक्स करू शकता. मिश्रण तयार करताना यात पाणी मिक्स करा. हे बॅटर फार जास्त पातळ करू नका. बॅटर शक्यतो घट्टच असूद्या.
पुढे गॅसवर एक फ्राय पॅन ठेवून घ्या. या पॅनवर थोडं तेल फिरवून घ्या. तेल पिरवल्यानंतर यावर थोडं थोडं करून मिश्रण डोसा प्रमाणे पसरवून घ्या. तयार झाला तुमचा कुरकुरीत डोसा. हा डोसा आणखी चविष्ट लागावा यासाठी तुम्ही यावर चिझ सुद्धा किसून टाकू शकता.
लहान मुलांना डब्ब्यात नेहमी वेगळं आणि युनीक काहीतरी द्यावं लागतं. आता त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मुलांसाठी मॅगी डोसा आणि सेम साहित्य वापरून मॅगी उपमा सुद्धा बनवू शकता. उपमा बनवताना तुम्हाला यात मैदा मिक्स करण्याची आवश्यकता नाही.
हेही वाचा:
वृषभसह आज ‘या’ 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, धनलाभाचे संकेत
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! 23 सप्टेंबरला येणार मनबा फायनांन्स कंपनीचा IPO
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक ‘प्रहार’!