लैंगिक अत्याचार केला १० व्या मजल्यावरून फेकलं १० वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रातून एक धक्कदायक(news) बातमी समोर येत आहे. मुंब्रामध्ये एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला टेरेसवरून फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.मुंब्राच्या ठाकुरपाडा परिसरातील श्रद्धा प्राप्ती या इमारतीच्या डगमध्ये एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह सापडला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चिमुकलीला टेरेसवरून फेकण्यात आले असून, तिच्या कमरेखालच्या अंगावर कपडे नव्हते.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे इरफान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी पाणी येत नव्हते. तेव्हा गच्चीवरून काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून(news) वाकून खाली पाहिले, तेव्हा एका चिमुरडीचा मृतदेह बिल्डींगच्या डगमध्ये पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तसेच पोलिसांनी(news) तपासाला सुरूवात केली आहे.या घटनेमागे नेमके कोण आहेत? या मुलीसोबत काही अत्याचार झाला होता का? याचा तपास पोलीस करीत आहेत. मृत मुलगी ठाकुरपाडा परिसरातीलच असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
ग्राहकांना मोठा दिलासा! होम लोन, कार लोन होणार स्वस्त
9 जणींसोबत संसाराचा डाव मांडला, 6 जणींसोबत एकत्र झोपण्यासाठी….
सुंदर भाचीवर आला देखण्या मामाचा जीव दोघांनी एकत्र घालवली रात्र मन भरलं नाही म्हणून केलं कांड
उन्हाळ्यात तुमच्या लॅपटॉपचे नुकसान होण्यापासून वाचवतील या टिप्स नक्की फॉलो करा