काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाची कहाणी असलेल्या धर्मवीर 2 सिनेमाची(new movie) प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता होती. कारण, एकनाथ शिंदे यांचे गुरू असलेल्या दिवंगत आनंद दिघेंच्या आयुष्यावर हा सिनेमा भाष्य करणारा असून ओघानेच एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग या चित्रपटात साकारण्यात आले आहेत. त्यातच, राज्यातील राज्यसभा निवडणुकानंतर शिवसेनेत झालेल्या बंडाळीचीही दखल चित्रपटात घेण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुनच हे बंड केल्याचं चित्रपटात दिसत आहे.
या बंडाचा सीन चित्रपटात(new movie) घेण्यात आलाय. त्यामुळे, शिंदेंसह सूरतमार्गे गुवाहटी गाठलेल्या 40 आमदारांपैकी काही आमदारांच्याही भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्या आहेत. त्यात, काय झाडी, काय डोंगर काय हॉटेल फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचीही भूमिका चित्रपटात दिसून येते. तसेच, भरत गोगावले यांच्या भूमिकेतही अभिनेता दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुवाहटी गाठले होते. विशेष म्हणजे गुवाहटीतील निसर्ग सौंदर्याची त्यांना भुरळ पडल्याचंही त्यावेळी दिसून आलं. शहाजी बापू यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, त्यामध्ये तेथील निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील एकदम ओक्के… असा त्यांचा डायलॉग फेमस झाला. तर, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सुरतकडे पहिलं पाऊल माझं पडलं होतं असंही शहाजी बापूंनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे, धर्मवीर 2 चित्रपटात शहाजी बापू यांचीही भूमिका दिसून येते.
चित्रपटात अभिनेता आनंद इंगळे यांनी शहाजी बापूंची भूमिका केलीय. शहाजी बापूंसारखी तब्येत, हलकीशी दाढी, थोडसं टक्कल आणि कपाळावर टीळा दिसून येतोय. त्यामुळे, धर्मवीर 2 सिनेमात शहाजी बापूंचा डिक्टो रोल साकारल्याचं दिसून येतंय. काय तो पेहराव, काय तो अभिनय, सगळंच एक नंबर… असे म्हणत नेटीझन्सकडून आनंद इंगळे यांनी साकारलेल्या शहाजी बापूंच्या भूमिकेचं स्वागत केलं जातंय.
दरम्यान, शहाजी बापूंसह मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्रीपदासाठी इच्छुक राहिलेल्या भरत गोगावले, संजय शिरसाट यांच्याही भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, भरत गोगावले यांची भूमिका अभिनेता सुनील तावडे यांनी साकारली आहे. सुनील तावडेंचा हा लूकही तंतोतंत लागू होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, धर्मवीर 2 सिनेमा आणखी चर्चेत आहे. आता, या आमदांरांचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियातून आमदारांची भूमिका चित्रपटात साकारण्यात आल्याचं सांगत आहेत.
हेही वाचा :
घटस्फोटाच्या बातमीनंतर ‘ही’ बॉलीवूड सुंदरी येणार बिग बॉसच्या घरात
केवळ 99 रुपयांत मिळणार ब्रँडेड दारु, या राज्य सरकारकडून नवीन एक्साईज पॉलिसी लागू!
‘आमच्या खेळाडूपासून दूर राहा’, पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी