शाहिद-करीना एकत्र video viral

अलिकडेच ‘आयफा पुरस्कार 2025’ सोहळा पार पडला. हा सोहळा(together) थाटात जयपूरला संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली. तसेच आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ केले. तर अनेक सेलिब्रेटींनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचा एक खास व्हिडीओ जो आजही तुफान व्हायरल होत आहे. तो म्हणजे स्टेजवर शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची झालेली भेट होय.

‘आयफा पुरस्कार 2025’ सोहळ्याला शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. तसेच एकमेकांना मिठी देखील मारली. दोघांनी हात देखील मिळवले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शाहिद आणि करीनाच्या भेटीनंतर सर्वत्र ‘जब वी मेट 2’ ची (together)चर्चा पाहायला मिळत आहे. चाहत्यांना ही जोडी पुन्हा एकत्र पाहायची आहे. यावर ‘जब वी मेट ‘ चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इम्तियाज अली नेमकं काय म्हणाले ?
इम्तियाज अली म्हणाले की, “आयफा पुरस्कार सोहळ्याला शाहिद आणि करीनाला एकत्र पाहून छान वाटले. मात्र ‘जब वी मेट’चा पार्ट २ म्हणजे सीक्वल बनवण्याची माझी इच्छा नाही. या चित्रपटाला मी मी तिथेच सोडू इच्छितो. कारण त्यामुळे मूळ सिनेमाची मजा खराब होऊ शकते. तसेच शाहिद आणि करीनासोबत (together)नवा चित्रपट बनवण्याचा सध्या माझा प्लान नाही. मात्र त्यावेळी दोघांसोबत काम करून चांगले वाटले. आज आम्ही स्टेजवर भेटलो आणि पुढे देखील आम्ही भेटत राहू…”

‘जब वी मेट’ चित्रपट
‘जब वी मेट’ चित्रपट 2007 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील गीत आणि अंशुमन यांच्या केमिस्ट्रीने तर सिनेमाला चार चाँद लावले. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहेत. शाहिद आणि करीना आधी एकमेकांना डेट करत होते. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. जे खूप हिट देखील झाले आहेत. खूप वर्षांनी शाहिद आणि करीनाला एकमेकांना भेटून आणि गप्पा मारून आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने दाखून दिले. या दोघांची ‘जब वी मेट’ चित्रपटातील केमिस्ट्री आजही चाहत्यांना भुरळ घालते.

हेही वाचा :

प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी

पालकांची धाकधुक वाढवणारी बातमी! यंदा शाळांचे… 

यंदाचा गुढीपाडवा नशीब पालटणारा! या 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होतोय