शरद पवारांनी रात्रीत सूत्रे फिरवली! अनिकेत देशमुखांचे बंड थंड; उत्तम जानकरही आज ‘तुतारी’ हाती घेणार

पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदार संघ(formula 1) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. माढ्यातून शेकापचे अनिकेत देशमुख हे बंडाच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंड झाले आहे.

शेतकरी कामगार(formula 1) पक्षाचे युवा नेते डॉ अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरणार असल्याची घोषणा केली होती.

मात्र अनिकेत देशमुख यांना शरद पवार यांनी रात्री तातडीने बारामतीला बोलावून घेत त्यांची नाराजी दूर केली. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, माढ्यामध्ये महायुतीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तम जानकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यावेळी उत्तम जानकर यांच्यासोबत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील अनेक बडे नेते शरद पवारांच्या पक्षात येणार आहेत.

हेही वाचा :

या ७ कारणांमुळे फोन होतो गरम, चुकूनही करु नका या चुका

सभा PM मोदींची अन् फोटो झळकले राहुल गांधींचे; उलटसुलट चर्चांना उधाण

मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका, कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची खास ऑफर