शरद पवारांनी CM पदाच्या चेहऱ्याचा प्रश्न एका वाक्यात संपवला

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत(political news). यावेळी त्यांच्या विविध कार्यक्रमांबरोबर अर्थसंकल्पावरही प्रतिक्रिया देत हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माडला असल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींमध्ये पवार यांनी कोल्हापूरात मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील यांनी पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अजित पवार यांना धक्का देणार का? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे. कालपासून विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली.

यामध्ये शरद पवार यांनी लोकसभा निवडणुका, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प(political news), भाजप, राहुल गांधी आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील का? या प्रश्नाचेही पवारांनी उत्तर दिले.यावेळी पवार म्हणाले की, “आम्ही सामुहिकपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे.

दरम्यान काल संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते की, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहर असायला हवा. त्याशिवाय निवडणुकांना कसे जायचे.” त्यानंतर आज शरद पवार यांनी स्पष्ट केले केले की, महाविकास आघाडी सामुहिकपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल.

पुढे पवारांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात का? त्यावर पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत आम्ही सामुहिकपणे मुख्यमंत्री पदाचा चेहर असू.” यावेळी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससह छोट्या पक्षांनाही संधी देणार असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही तीन प्रमुख पक्ष लढलो पण त्यामध्ये महाविकास आघाडीला आप, शेकाप आणि अनेक डाव्या नेत्यांनी मदत केली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेक टोले लगावले. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी फेल गेली. त्यांनी महाराष्ट्रात जिथे सभा घेतल्या तिथे जवळपास सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्यावात.”

हेही वाचा :

महाराष्ट्रात वर्षाला 3 मोफत सिलेंडर कोणत्या कुटुंबांना मिळणार ?

सांगली जिल्ह्यातील “महाराष्ट्र केसरी” सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं,

‘या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या, पावसात भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही