मराठा-ओबीसी संघर्षावर शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले; आता…
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी(political articles) आली आहे. याठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. तर मंगेश ससाणे यांनी ओबीसी बचावासाठी उपोषण सुरू केले आहे. वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचेही उपोषण सुरु आहे. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
शरद पवार(political articles) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सामंजस्याने यातून मार्ग काढला पाहीजे, असे सांगितले. तसेचं “तणाव निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. कारण आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचा आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंज्यस्य कसे राहिल, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतले पाहीजे. तसेच वातावरण चांगले कसे राहिल, याचीही खबरदारी घेतली गेली पाहीजे.” असं पवार म्हणाले.
वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी काल रस्ता रोको केला. त्यामुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जात होता. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवला आहे.
आता सहाव्यांदा जरांगे पाटील मैदानात उतरून आमरण उपोषण करून विधासभा निवडणुकीआधी अंतिम लढाई करत आहेत. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीने काल काही ठिकाणी बंदची हाक दिली होती तर आजही काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आलेले आहे.
हेही वाचा:
मी राजीनामा का दिला…; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले
भररस्त्यात तरूणाने रूसलेल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी केले असं काही…Video
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या भिंतींना, घुमटाला तडे