आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य…
आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण(reservation) 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षण(reservation) मिळावे ही लोकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला.
तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून? असा प्रश्न देखील प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारला. यावेळी शरद पवार म्हणाले की, जसे जसे वय वाढते तस तशी एनर्जी वाढते. यावेळी बोलतना शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्याबबातही प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जे योग्य वाटते ते भले सरकारच्या विरोधात असतील तरी बोलतात असंही शरद पवार म्हणाले.
एमआयएमने दिलेल्या प्रस्तावाबाबत देखील शरद पवारांना विचारण्यात आले, यावेळी पवार म्हणाले की, कुणी काय प्रस्ताव दिलाय हे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाहतात, मला याबाबत काही कल्पना नसल्याचे पवार म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबाबत आता आमचे जयंत पाटील काही बोलत नाहीत. आम्हाला जे लोक भेटून जातायेत ते आमचे जुने मित्र असल्याचे शरद पवार म्हणाले.
अमित शाहा यांचा अलीकडे महाराष्ट्रात मुक्काम जास्त असतो याबाबत प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशाचा गृहमंत्री भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या 18 ठिकाणी सभा झाल्या होत्या. यामध्ये 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळं यावेळी देखील त्यांनी जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी लगावला.
हेही वाचा :
भाजपने उचलले मोठे पाऊल; आठजण निलंबित
पतीशी भांडणानंतर पत्नीने केली 8 महिन्यांच्या मुलीची हत्या
500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एल्विश यादव, भारती सिंहची होणार चौकशी