कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे नवे मोहरे: समरजीत घाटगे यांना भाजपविरोधात उभे करण्याचे प्रयत्न
कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महाराष्ट्राच्या(political news) राजकीय पटावरील मोहरे हलवायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाने कोल्हापूरमधील भाजप नेते समरजीत घाटगे यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे.
समरजीत घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय(political news) नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मात्र, आता शरद पवारांनी फडणवीसांचा हाच खास मोहरा फोडण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महायुतीकडून कागलमध्ये अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित आहे. काल फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात संजयबाबा घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, शरद पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी समरजीत घाटगे यांच्याशी दोन वेळा संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे आणि समरजीत घाटगे यांच्यात सातत्याने बोलणी सुरु आहेत.
मात्र, समरजीत घाटगे यांनी अद्याप शरद पवार गटाचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, ते या प्रस्तावाबाबत विचार करत असल्याची माहिती आहे. समरजीत घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यास हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. तसेच यामुळे हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी चांगलीच वाढेल.
समरजीत घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक असले तरी कागलमधून त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणे अवघड दिसत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
हेही वाचा:
गोलंदाजी करताना दोनदा अडखळला…रोहित शर्मा थेट वॉशिंग्टन सुंदरला मारायला धावला, Video
मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये; अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबडेकरांवर पलटवार
व्यसनाधीन तरुणाचा आईवर बलात्कार, आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना