‘धोनीला पाकिस्तानी टीमचा कर्णधार केलं तरी…’; ‘तिने’ मोजक्या शब्दात लाज काढली

पाकिस्तानच्या महिला क्रिकेट(cricket) संघाच्या माजी कर्णदार साना मीर यांनी पुरुष संघाच्या कामगिरीवरुन निशाणा साधला आहे. सोमवारी पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमधून बाहेर पडल्यानंतर साना मीर यांनी कठोर शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला. महेंद्र सिंग धोनी सुद्धा या संघाचं नशीब बदलू शकत नाही, असा टोला साना मीर यांनी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाबद्दल बोलताना लगावला आहे.

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड आणि भारताविरूद्धचे सलग दोन सामन्यांमध्ये(cricket) पराभूत झाला. सोमवारी न्यूझीलंडने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारत आणि न्यूझीलंडचा संघ सेमी-फायनलसाठी पात्र ठरला आणि यजमान पाकिस्तानी संघ स्पर्धेबाहेर पडला. या सामन्यानंतरच साना मीर बोलत होत्या.
“जे 15 लोक (चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी) निवडण्यात आले आहेत त्यांना महेंद्र सिंह धोनी किंवा युनिस खान यांच्या नेतृत्वाखाली खेळवलं तरी काहीच परिणाम या संघावर होणार नाही. कारण हा संघ परिस्थिती लक्षात घेऊन निवडण्यात आलेला नाही,” असं साना मीर यांनी ‘गेम ऑन है’ या कार्यक्रमात मत व्यक्त करताना म्हटलं.
“माझ्या एका मित्राने मला मेसेज केला की भारताची अवस्था 100 वर 2 अशी आहे. मला वाटतं की आपला (पाकिस्तानचा) खेळ संपला आहे. त्यावेळी मी सामना पाहण्यास सुरुवात केली. मात्र मी त्या मित्राला मेसेज केला की संघाची निवड केली तेव्हाच आपल्यासाठी सारं काही संपलं होतं,” असं साना मीर म्हणाल्या.
पाकिस्तानसाठी 300 हून अधिक सामने खेळलेल्या साना मीर यांनी पाकिस्तानच्या निवड समितीवर निशाणा साधला आहे. परिस्थिती लक्षात घेत संघ निवडण्यात अपयश आल्याचं साना मीर यांनी म्हटलं आहे. “15 जणांचा हा संघ निवडला तेव्हाच आपण अर्धी स्पर्धा हारलो होतो. मी हे अगदी पहिल्या दिवसापासून सांगतेय. त्यांना (निवडकर्त्यांना) ठाऊक होतं की पाकिस्तानला किमान एक सामना तरी दुबईमध्ये खेळावा लागणार होता.
मग तुम्ही दोन पार्ट टाइम फिरकीपटू कसे निवडू शकता? अबरार अहमद जो अजून एकदिवसीय सामन्यांमध्ये नवखा असून केवळ पाच महिन्यांपासून खेळत आहे त्याला स्थान दिलं. 165 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या फक्त. निवड समितीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळलेल्या खेळाडूंना वगळून चूक केली,” असं स्पष्ट मत साना मीर यांनी मांडलं.
“इरफान (खान) नारझी हा चांगला फिल्डर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत उत्तम फटकेबाजी केली. त्यामुळेच मी म्हणते की संघ जाहीर झाला तेव्हाच आपण पराभूत झालो,” असं 33 वर्षीय साना मीर यांनी संताप व्यक्त करताना म्हटलं.
हेही वाचा :
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता वर्षातून दोन वेळा परीक्षा
धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..
धक्कादायक! दर मिनिटाला एका महिलेचा ‘या’ कॅन्सरने मृत्यू; WHO च्या रिपोर्टमधून मोठा दावा