तिने प्रेमसंबंधाला नकार दिला अन् तरुणाने ”त्या’ फोटोंचं असं काही केलं की…

पुणे: प्रेमसंबंधाला नकार दिल्यानंतर संबंधित तरुणीच्या नावाने सोशल मिडीयात(social media)बनावट खाते उघडून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला.

याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोथरुड भागात राहते. तरुण तिच्या ओळखीतील असून, त्यांच्यात मैत्री देखील आहे.

दरम्यान, तरुणीने त्याच्याबरोबर असलेले मैत्रीचे नाते तोडले होते. त्यामुळे तरुण प्रचंड चिडलेला होता. रागातूनच त्याने तरुणीच्या नावाने सोशल मिडीयात(social media) बनावट खाते उघडले. त्यावर तरुणी आणि तिच्या आईच्या नावाने मजकूर टाकून बदनामी केली. तसेच, अश्लील छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली.

काही तासांनीच तरुणीच्या हा प्रकार दिसून आला. यानंतर तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा तरूणाने तिला शिवीगाळ केली. तसेच, पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जीवे मारु, अशी धमकीही दिली. तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितला. नंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

स्वारगेटमधील जेधे चौकात पीएमपी बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार या हडपसरवरून पीएमपी बसने स्वारगेट परिसरात आल्या होत्या. जेधे चौकात बस थांबल्यानंतर त्या उतरल्या. तेव्हा बसमधून उतरताना मोठी गर्दी होती. या गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

हेही वाचा :

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का…

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ गावात अद्याप एकही मतदान नाही

सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण