शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला

आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक(political news today) पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमर पाटील यांना पाठिंबा ना देता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे कुटुंबावर सडकून टीका केली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून(political news today) खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप केला जात आहे.

यावेळी शरद कोळी म्हणाले की, शिंदे कुटुंबांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे या भाजप पक्षाचा प्रचार करतात आणि त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी देखील केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी देखील आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिला आहे.

याप्रकरणी शरद कोळी यांनी शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापल्याचा आरोप देखील केला आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी थेट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता अपक्षला मत म्हणजे भाजपला मत असं झालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार हा अमर पाटील असून त्यांनाच निवडून आणायचे आहे.

तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. तसेच शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानणे ऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम देखील केले आहे. त्यामुळे ही माणसं धोकेबाज निघाली. त्यामुळे आता गद्दाराकडून काय अपेक्षा करणार? असा हल्लाबोल शरद कोळी यांनी केला आहे.

हेही वाचा :

तिने प्रेमसंबंधाला नकार दिला अन् तरुणाने ”त्या’ फोटोंचं असं काही केलं की…

सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ गावात अद्याप एकही मतदान नाही