शिवसेनेला घरघर; ‘या’ बड्या नेत्याचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; गळती रोखण्याचे आव्हान
नांदेड: विधानसभा निवडणुकीत(current political news) महायुतीला मोठे यश प्राप्त झाले. तर महाविकास आघाडीला 50 पेक्षा जास्त जागा जिंकता आलेल्या नाहीत. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात मोठे यश मिळवले. तर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे.
एकनाथ पवार यांनी राजीनामा(current political news) दिल्याने उद्धव ठाकरेंसाठी नांदेड जिल्ह्यात हा फार मोठा धक्का मानला जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार आहेत. एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्याने नांदेडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा दिल्यानंतर एकनाथ पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झाडल्या गेल्या. अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना राम राम करण्याचा चंग बांधला असून पक्षातील निष्ठावंत सैनिकांना या निवडणुकीत पुन्हा एकदा डावल्याचे भावना या कार्यकर्त्यांमध्ये झाली होती.
विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते हे उमेदवारी न मिळाल्याने चांगलेच नाराज झाले होते. याच नाराजीचा परिणाम आता दिसू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील तसेच जिल्ह्यातील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होतील अशी चर्चा नगरमध्ये चांगली रंगत होती.
या वृत्ताला आता पुष्टी मिळाली असून आज ठाकरेंच्या सेनेला गळती सुरू झाली आहे. नगर शहरातील निष्ठावंत सैनिकांसह काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय खलबतं सुरू असताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आज नाशिकमध्ये माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील अनेक तालुक्यांमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इतर पक्षातील नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. अलिकडेच नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्ह्याध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा :
‘…अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश’ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट
‘मला धनुषने जास्त किसिंग सीन्स…’; दिग्दर्शकाने केला खळबळजनक खुलासा
‘लिव्ह लाइफ, लिवो स्टाइल’ म्हणत होंडाने लाँच केली New 2025 Livo, किंमत 1 लाखांपेक्षाही कमी