माघी गणेश जयंतीला जुळून आला शिव योग; वृषभसह ‘या’ 5 राशींवर बाप्पा होणार प्रसन्न

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 1 फेब्रुवारीचा दिवस आहे. आज माघी गणेश जयंतीचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी(astrology) शुभ असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज शिव योग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा(astrology) लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

वृषभ रास
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आजचा दिवस कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ आहे. तसेच, तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तसेच, तुमचं मन प्रसन्न असेल.

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. महत्त्वाच्या कामात तुम्हाला मित्रांची साथ लाभेल. आज तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. त्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.

सिंह रास
सिंह राशीच्या(astrology) लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, राजकीय क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. आज काही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. तसेच, माघी गणपती असल्या कारणाने बाप्पाचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल.

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रसन्नतेचा असणार आहे. आज विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी वाढलेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या घरी आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. तुम्हाला पैशांसाठी कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.

मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुम्ही ज्या कामाचं नियोजन केलं आहे. ते काम वेळेत पूर्ण होईल. तसेच, तुमचे फसलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीत तुमची गुंतवणूक करु शकता. मित्र-परिवाराचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

सुसाट रिक्षातून ३ विद्यार्थिनी पडल्या; एकीचा जीव गेला

सांगली : आठ व नऊ फेब्रुवारीला शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

अश्विनवर संशय घ्यायची त्याची पत्नी, ‘या’ खेळाडूवर क्रश असल्याची होती शंका