शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना धक्का; दोन मोठे नेते गेले पक्षातून
विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. भाजपासह (resound)या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. लोकसभेत एका जागेवर विजय मिळवणाऱ्या राष्ट्रवादीने या विधानसभा निवडणुकीत 40 च्याही पुढे जागा काबीज केल्या. तर महाविकास आघाडीला जनतेने जोरदार धक्का दिलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तर जेमतेम 10 जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांची इनकमिंग दिसून आली.अनेक बड्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार व उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र निकालानंतर हे चित्र बदलताना दिसून येत आहे. त्यात अजित पवार गटात सध्या काही नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे. अजित पवारांनी पहिला धक्का हा शरद पवार यांना दिलाय.
श्रीगोंदा मधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. राहुल जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या फुटी वेळी राहुल जगताप यांनी शरद पवारांची साथ निवडली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभेत राहुल जगताप हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र ही जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला गेल्याने येथे ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली होती.
त्यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले. श्रीगोंद्यात महायुतीचे विक्रम पाचपुते यांचा दणदणीत (resound)विजय झाला. या पराभवानंतर राहुल जगताप हे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. त्यांनी नुकतीच अजित पवार यांची भेटही घेतली आहे. या भेटीमुळे जगताप पवारांची साथ सोडणार या चर्चेला उधाण आलंय. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातीलही एक बडा नेता अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अपूर्व हिरे यांनी आज 2 डिसेंबर अजित पवार यांची भेट घेतली आहे. अपूर्व हिरे हे यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटातच होते. यंदाच्या विधानसभेत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे निवडणुकीच्या रिंगणात होते. आपल्या बंधूचा प्रचार करण्यासाठी अपूर्व हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत अजित पवार गटाला सोडचिट्टी दिली होती.
मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा पराभव केला. या पराभवानंतर आता अपूर्व हिरे यांनी मुंबईत नुकतीच अजित पवारांची भेट घेतलीये. त्यामुळे अपूर्व हिरे (resound)पुन्हा राष्ट्रवादीत घरवासी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शरद पवार गटाशी एकनिष्ठ असलेले राहुल जगताप यांच्या पाठोपाठ आता अपूर्व हिरे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं बोललं जातंय. असं झाल्यास विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हा पहिला मोठा धक्का मानला जाईल.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!
डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या… अन्यथा बसू शकते खिशाला झळ!
‘उद्धव ठाकरे सोबत असते तर…’; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य