धक्कादायक! भावानेच संपवलं बहिणीला, 200 फूट उंच डोंगरावरुन दिलं ढकलून
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीचा 200 फूट डोंगवरुन खाली ढकलून खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्या चुलत भावानेच(Brother) तिला ढकलून देऊन संपवलं आहे. नम्रता गणेश शेरकर वय 17.2 वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर घरच्यांची समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले होते.
त्यानंतर काकाचा मुलगा(Brother) ऋषिकेश हा नम्रताला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला ढकलून दिले, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. नम्रता गणेश शेरकर वय 17.2 वर्ष अशी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर वय 25 वर्ष असे ढकलून दिलेल्या भावाचे नाव आहे.
हेही वाचा :
फक्त 6999 रुपयांमध्ये 8 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन लाँच
खरंच राम कपूरने सर्जरीद्वारे घटवले वजन? ट्रान्सफॉर्मेशनबाबत अभिनेत्याने सोडले मौन!
एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या