धक्कादायक! महिलेची निर्घृण हत्या, शरीराचे तुकडे करून रेल्वेत फेकले
ऋषिकेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे रेल्वे(area) स्थानकत एका रेल्वेत महिलेचे अवयव सापडले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मध्य प्रदेशातील उत्तराखंडमधून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. उज्जैनहून ऋषिकेशला जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या डब्यात एका महिलेच्या शरीराचे कापलेले हात-पाय सापडले आहेत. या घटनेने रेल्वेत एकच खळबळ उडाली. रेल्वे गाडीच्या डब्यात असलेल्या पॉलिथिनच्या पिशवीत महिलेच्या शरीराचे तुकडे आढळले. ही घटना उघडकीस येताच रेल्वे पोलिसांनी पोलिसांच्या मुख्य पथकाला याबद्दल माहिती दिली.
मध्य प्रदेशातील उत्तराखंडमधून एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. उज्जैनहून ऋषिकेशला जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या डब्यात एका महिलेच्या शरीराचे कापलेले हात-पाय सापडले आहेत. या घटनेने रेल्वेत एकच खळबळ उडाली. रेल्वे गाडीच्या डब्यात असलेल्या पॉलिथिनच्या पिशवीत महिलेच्या शरीराचे तुकडे आढळले. ही घटना उघडकीस येताच रेल्वे पोलिसांनी पोलिसांच्या मुख्य पथकाला याबद्दल माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ही संपूर्ण घटना उघडकीस (area)आली. उज्जैन एक्स्प्रेस सोमवारी दुपारी ऋषिकेश स्थानकावर पोहोचली होती. त्यानंतर रेल्वेमधील सर्व प्रवासी उतरल्यानंतर ट्रेन स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग लाइनवर नेण्यात आली. दरम्यान ट्रेनची संपूर्ण साफसफाई करताना काही कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये दोन पिशव्या आढळल्या. मात्र या नुसत्या पिशव्या नसून त्यामधून खूप दुर्गंधी येत होती. जेव्हा त्या पिशव्या उघडून पाहिल्या. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पिशवी उघडून पाहिले असता त्यामध्ये एका टॉवेलमध्ये गुंडाळलेले एका महिलेचे कापलेले दोन हात आणि पाय आढळले. घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याची संपूर्ण माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेत सापडलेल्या महिलेच्या शरीराच्या अवयवावर एक
याआधीही ९ मे रोजी इंदूरमध्ये एका महिलेचे धड सापडले होते. मात्र त्या महिलेचा तपास अजून करण्यात येत आहे. परंतु आता सापडलेल्या महिलेच्या अवयवांच्या तुकड्यांचा त्या (area)घटनेशी संबंध असू शकतो, असे सांगण्यात येत आहे. या घटनेचा अधिकचा तपास केला जाईल, असे इंदूर पोलिसांनी सांगितले.
देखील आढळला आहे. ज्यावरुन त्या महिलेचे नाव मीराबेन असल्याचे समजून येत आहे. तसेच त्यामध्ये एका हातात बांगडीही होती. त्यावरुन मिळालेले अवयवांचे तुकडे एका महिलेचे असल्याचे समजले. डेहराडूनहून आलेल्या फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने घेतले. सापडलेले हात आणि पायांचे नमुने घेऊन त्याचे डीएनएही व्यवस्थित ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा :
इचलकरंजी: कुख्यात एस.टी. सरकार गॅंगवर माेठी कारवाई
शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा लागेल; कोणत्या महामार्गाबाबत बोलले मुश्रीफ?
सांगली दुष्काळी भागात सरासरीच्या दुप्पट पाऊस