वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे धक्कादायक मागणी; 22 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल
वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला घरी नेण्याचा बहाणाकरून अज्ञात ठिकाणी (unknown)नेहून बड्डे गिफ्ट म्हणून शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु मुलीने नकार दिल्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी १७ वर्षीयअल्पवयीन मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २२ वर्षाच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ जुलै २०२४ रोजी घडला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने मुलीला घरी घेऊन जातो, असे सांगितले. तसेच, घरी न घेऊन जाता तिला अज्ञात ठिकाणी एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत नेले. तेथे आज माझा वाढदिवस आहे.
तर मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे, असे म्हणून तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. तेव्हा तिने नकार दिला असता तरुणाने तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. तसेच तुने इसके बारेमे किसको बताया, तो तेरा अब्बा मर जायेगा, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करीत आहे.अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅटद्वारे ओळख निर्माण केली. ओळखीनंतर तिला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास भाग पाडले. यानंतर मात्र या फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेलकरत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी चौघांवर (unknown)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे.
हा प्रकार १ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान घडला. आरोपी व पिडीत मुलगी यांची स्नॅपचॅटद्वारे ओळख झाली होती. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आरोपींनी सातत्याने तिच्यासोबत स्नॅपचॅटवर अश्लिल चॅटींग केले. तिला स्नॅपचॅटवर कोणाकोणासोबत बोलतेस हे सांगेण अशी धमकी दिली. तिला ब्लॅकमेल करून तिला नग्न फोटो पाठविण्यास भाग पाडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल चॅटिंग करून, फोटो व अश्लिल व्हिडीओ पाठवून तिला शरीर सुखाची मागणी केली.
महिलेचा पाठलाग करून तिला लॉजवर चल म्हणत व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन शरिर सुखाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत (unknown)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ दिवसांपूर्वी घडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आरोपीने तिला बदनामी करण्याचीही धमकी दिली.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या मुलाचं नाव जाहीर!
डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या… अन्यथा बसू शकते खिशाला झळ!
‘उद्धव ठाकरे सोबत असते तर…’; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य