धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात (political updates)खळबळजनक बातमी समोर आली आहे. कारण ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगाव येथील मेहरुण परिसरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अपक्ष उमेदवार(political updates) अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. मात्र या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेवेळी अज्ञात इसमाने हुसेन यांच्या घरावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या गेल्या.
महत्वाचं म्हणजे अहमद हुसेन शेख यांचे घर हे मेहरुण परिसरातील शेरा चौकात आहे. अशातच आज पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अशातच गेल्या आठ दिवसापूर्वी मुक्ताईनगर येथील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आला होता. मात्र या घटनेला आठ दिवस उलटत असतानाच आता पुन्हा एकदा शहरातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे.
मात्र या गोळीबारात त्यांच्या घरातील खिडकीचे काच देखील फुटलेले आहेत. तसेच जिवंत काडतुसे देखील घटनास्थळी सापडले आहेत. मात्र या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरु आहे.
हेही वाचा :
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी आहे की नाही?
“या नेत्यानी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला” ठाकरेंच्या आरोपावर प्रतिउत्तर
‘पुष्पा- द रुल’च्या ट्रेलर लाँचदरम्यान उडाला गोंधळ, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांवर झाला लाठीचार्ज!