धक्कादायक! आधी चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम केला, नंतर तरुणाला निर्वस्त्र करून चटके दिले

जालन्यात एका तरुणाला गरम तापलेल्या लोखंडी रॉडने निर्वस्त्र करून (heated)अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास पारध पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे एका ३६ वर्षीय व्यक्तीला चुलीमध्ये तापलेल्या गरम लोखंडी रॉडने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. कैलास बोराडे असं या मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतीवरून झालेल्या जुन्या वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक (heated)माहिती आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी संशयित आरोपींची नावे आहेत. कैलास बोराडे आणि नवनाथ दौंड यांचा मागील काही दिवसापूर्वी शेतीच्या प्रकरणावरून वाद झाला होता. त्यामुळे नवनाथ दौंड याच्या सांगण्यावरून सोनू उर्फ भागवत दौंड याने त्यांना अमानुष मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी (heated)जालन्यातील पारध पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपींनी या व्यक्तीला किरकोळ वादातून अमानुष मारहाण केली. चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम करून या व्यक्तीच्या पायाला, पोटाला आणि पाठीला त्याचबरोबर मानेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमा देखील केल्या आहेत. याप्रकरणी जालन्यातील पारध पोलिस ठाण्यामध्ये दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
1 मार्चपासून ‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जगतील राजासारखं आयुष्य
जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल