रील्ससाठी ट्रेनच्या सीट फाडण्याचा धक्कादायक प्रकार! VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले म्हणाले…

सध्याची तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मग पर्यटन स्थळावर गेल्यानंतर रील्स बनवणे तर कधी फोटो काढणे,अशा गोष्टी करत असतात, मात्र गेल्या काही वर्षापासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना रील्स बनवणे अत्यंत आवडू लागले आहे पंरतू अनेकदा रील्स बनवताना ते कोणत्या थराला जातात त्यांनाही समजत नाही. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ (video)व्हायरल होत आहे, ज्यात त्याने रील्सवर प्रसिद्द होण्यासाठी काय करतील हे या व्हायरल व्हिडिओमधून तुम्हाला दिसून येईल.

सोशल मीडियावर यापूर्वी अनेक असे रील्स व्हिडिओ (video)व्हायरल झाले आहेत, ज्यात अनेकदा काही व्यक्तींना त्यांचा जीव गमवावा लागला आहे तर काहींनी कायमसाठी अपंगत्व आले, मात्र धोकादायक ठिकाणी स्टंट व्हिडिओ असेल किंवा सोशल मीडिया प्रसिद्ध होण्यासाठी केलेला रील्स असेल ते प्रकार थांबवण्याचे नाव काही व्यक्ती घेत नाही.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ चक्क एका व्यक्तीने ट्रेनमधील सीट फाडल्या आहेत ते आणि ते फक्त रील्सवर प्रसिद्ध होण्यासाठी. व्हिडिओ सध्या प्रत्येक नेटकऱ्यांच्या मोठ्या चर्चेत आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला ट्रेन दिसत आहे. मात्र ती लोकल ट्रेन नसून एक एक्सप्रेस ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये एक व्यक्ती आहे जो कोणताही विचार न करता ट्रेनच्या सीटवर असलेले कापड फाडत आहे. एवढ्यावर तो व्यक्ती थांबलेला नाही तर सीटचे कव्हर फाडून धावत्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर फेकून देत आहे आणि करत असलेली कृती सोशल मीडिया प्रसिद्ध होण्यासाठी रील्स व्हिडिओमध्ये ते शूट करत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे.

ट्रेनमधील त्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या ”एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो तुम्हाला ”@MrSinha_” या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या ट्रेनमधील शिवाय कोणत्या मार्गावरील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक यूजर्स हैराण झालेला आहे.

एवढेच नाही तर ज्या वेळेस व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच एक्स यूजर्संनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”पागल झाला आहे तो,त्याला वैद्यकीय मदतीची गरज आहे”, तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”मनोरुग्ण आहे तो” तर अशा अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : व्हायरल होत असलेल्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हायरल व्हिडिओची किंवा त्या व्यक्तीची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

हेही वाचा :

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा!

“ICC रँकिंगमध्ये बुमराहचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर!

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार