धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

मागील २ वर्षांपासून अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची(youth) कपात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यात आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा लोकांच्या कामावर परिणाम होताना दिसत आहे. जगभरातील अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यावर भर देत आहेत.

इंटेलिजंटच्या एका सर्वेक्षणानुसार काही कंपन्या(youth) त्यांनी नुकत्यात कामावर घेतलेल्या Gen-Z च्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे प्लॅनिंग करत आहेत. एका अहवालात असे आढळून आले आहे की, अमेरिकेतील ८०० कंपन्यांपैकी ७८ टक्के लोकांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, त्यांची कंपनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या प्रगतीमुळे नुकत्याच कामावर घेतलेल्या पदवीधारकांना अर्थात Gen-Z च्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या विचारात आहेत.

विशेष म्हणजे केवळ २२ टक्के नियुक्ती व्यवस्थापकांनी असे सूचित केले की, नुकतेच कामावर घेतलेले पदवीधारक AI मुळे त्यांच्या कंपनीतील टाळेबंदी अर्थात कर्मचारी कपातपासून सुरक्षित आहेत. त्यांनी असे मान्य केले की, हे कर्मचारी कपातचे स्वरूप फार मोठे असू शकत नाही. परंतु, नुकत्यात कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे प्लॅनिंग करत असलेल्या कंपन्यांपैकी २३ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल. २७ टक्के लोकांनी असे सांगितले की, ५ ते १० टक्के कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या गमावतील.

दरम्यान, या सर्वेक्षणानुसार, ११ टक्के कंपन्या त्यांनी अलीकडेच कामावर घेतलेल्या पदवीधर कर्मचाऱ्यांपैकी १५ ते ३० टक्के कर्मचारी कपात करण्याचा विचार करत आहेत आणि एकूण संख्येनुसार ३० ते ६० टक्के कर्मचारी कामावरून कमी केले जातील. इंटेलिजंटचे मुख्य शिक्षण आणि करिअर-विकास सल्लागार ह्यू न्गुयेन यांच्या मते, नुकत्याच पदवीधर झालेल्या आणि नव्याने कामावर रूजू झालेल्या तरूणांच्या कामाच्या स्वरूपाला AI किती सहजपणे बदलू शकते, यावर कर्मचारी कपातची शक्यता निर्भर असेल.

अलीकडे अनेक कंपन्या नुकत्याच पदवीधर झालेल्या तरूणांना एंट्री लेव्हलच्या जॉबसाठी कामावर नियुक्त करत आहेत. ज्यामध्ये संशोधन, डाटा एंट्री, ग्राहकसेवा आणि ऑफिस असिस्टंट इत्यादी माहितीशी संबंधित कामांचा समावेश असतो. न्गुयेन यांनी अहवालात म्हटले आहे की, ‘या एंट्री लेव्हलच्या जॉबमुळे पहिल्यांदाच कामाचा अनुभव घेणाऱ्या लोकांना महत्वाचा आणि चांगला अनुभव मिळतो. परंतु, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने हे काम सहजपणे केले जाते’.

हेही वाचा :

भाजपच्या सभेला ३०० रुपये देऊन रोजंदारीने माणसं? रोहित पवारांनी शेअर केला VIDEO

अजित पवारांना मोठा दिलासा; कचाकच बटण दाबा वक्तव्यावरून क्लीनचिट

समांथाच्या फॅशनचा थाटच न्यारा, हटक्या पद्धतीने कॅरी केला वेडिंग गाऊन