धक्कादायक! एसटी चालकाला फीट आली, गाडीवरचा ताबा सुटला अन्….
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक(driver) बातमी समोर आली आहे. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ एका एसटीला अपघात झाला आहे. एसटी चालकाला फीट आल्यामुळे चालकाचा एसटीवरील ताबा सुटला आणि एसटी महामार्गालगत असलेल्या शेतात पलटी झाली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी(driver) असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त नागरिकांना एसटीतून बाहेर काढले. अपघातातील जखमींना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणत्या जिवीतहानीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
एसटीमध्ये वृद्ध महिला आणि पुरुषही होते. अपघातामुळे बसमधील प्रवासी चांगलेच घाबरले. त्यामुळे जसे जमेल तसे प्रत्येकाने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत स्थानिक नागरिकही तिथे पोहचले आणि त्यांनी मदत कार्यास सुरूवात केली.
स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत त्यांना शेतातील मोकळ्या जागेत बसवले. एसटी चालकाला बाहेर काढण्यात आले त्यालाही शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा :
पेट्रोलचे दर जाहीर १ लिटर इंधनसाठी किती रुपये मोजावे लागणार?
दिवसाढवळ्या गोळीबार; आईस्क्रीम व्यावसायिक गंभीर जखमी
मतांसाठी काँग्रेसचे राजकारण, शिवभक्तांना अतिरेकी म्हणणे दुर्दैवी; धैर्यशील मानेनी मौन सोडलं….