लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुष्ट कपटी सावत्र भाऊंनी लाडकी बहीण योजनेत(political news todays) खोडा घातला त्यांना जोडा दाखवण्याची वेळ आलीय असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political news todays) यांनी यावेळी दिली.कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते. येथील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते.

महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या सहा महिन्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय, गुंतवणूक, स्टार्टअप,पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला. त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचे सुतोवाच मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर लोकसभेतील फेक नरेटीव्ह आता चालणार नाही. जे संविधान बदलाची ओरड करत होते त्या काँग्रेस पक्षानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करत खूप त्रास दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका, शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्य बाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले, ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामांची गंगा आज निर्माण झाली नसती. तर येत्या काळात कल्याण पश्चिमेतील मेट्रोचे कामही लवकर सुरू होईल असे आश्वासन ही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारुद बनता हैं उसे विश्वनाथ कहते हैं अशा सुप्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक केले. तसेच या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगतानाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले,राज्यामधील महिला भगिनींकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याचे बदलापूरच्या नराधमासारखेच परिणाम होतील. तर भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील यांचे महायुती धर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी दोघांचेही जाहीर अभिनंदन केले.

कल्याणमध्ये विविध शासकीय संस्थांच्या माध्यमातून 2 हजार 40 कोटींची विकासकामे सुरू आहेत. ही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंतचा थोडी कळ सोसा. तर आधीच्या सभेमध्ये दिलेले कुशावली धरण, मुंबईच्या धर्तीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर, कल्याण पश्चिम विकास पाहता ती महायुती पाठीमागे उभी राहील आणि भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा :

ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन

“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला

मोठी बातमी! महायुतीला खिंडार, अनेक भाजप कार्यकर्ते पवारांच्या पक्षात