श्रेयस अय्यरचं नशीब फळफळणार, BCCI करणार घोषणा

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आहे. ९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट चाहते सामना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी(team india) सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे, सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता, अय्यरला बीसीसीआयकडून मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ज्याची अय्यर गेल्या एक वर्षापासून वाट पाहत होते. अय्यरला आता लवकरच बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळू शकतो.

टीम इंडियाचा(team india) स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला २०२४ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केंद्रीय करारातून वगळले होते. अय्यरसोबतच, ईशान किशनलाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले. खरंतर, देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला केंद्रीय करारातून वगळण्यात आले. एकीकडे ईशान किशन सतत टीम इंडियाबाहेर असतो, तर दुसरीकडे श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी सतत चमकदार कामगिरी करत असतो.
जर बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला केंद्रीय करारातून काढून टाकले, तर पुन्हा केंद्रीय करार मिळविण्यासाठी, बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला 3 कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० सामने खेळावे लागतात. त्याच वेळी, केंद्रीय करार यादीतून वगळल्यापासून अय्यरने १० एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३, इंग्लंडविरुद्ध ३ आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने सातत्याने स्वतः साध्य केले आहे. त्याचबरोबर सिलेक्टर्सच्या नजरेत देखील राहिला आहे.
SHREYAS IYER BACK CENTRAL CONTRACT
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2025
– Shreyas Iyer is likely to get back his BCCI Central Contract after being removed last year. [TOI] pic.twitter.com/4Y5zlXvLYG
इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला विराट कोहलीच्या दुखापतीमुळे संधी देण्यात आली होती त्यावेळी त्याने संधीचे सोने केले आणि टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी करून दाखवली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरची कामगिरी अद्भुत राहिली आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना १९५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. अय्यरने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४५ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. अय्यर हा स्पर्धेत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने फक्त फलंदाजीनेच नाही तर त्याच्या फिल्डिंगने देखील चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
हेही वाचा :
होळीला बनतोय ‘हा’ जबरदस्त संयोग! ‘या’ 3 राशींवर पैशांचा पाऊस पडणार…
अंगणवाडी सेविकांना खूशखबर! मिळणार 1 कोटी 92 लाख रुपयांचा प्रोत्साहन भत्ता..
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा