मृत्यूच्या खोट्या अफवांवर भडकला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी जीवंत आहे”
मराठी तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे नुकताच एका मोठ्या संकटातून(death) बाहेर पडला आहे. खरं तर त्याला दुसरा जन्मच मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे तो बरेच दिवस रुग्णालयातच होता. या कठीण प्रसंगातून आता तो आणि त्याचं कुटुंब सावरलं आहे. अशात श्रेयसबद्दल एक वेगळ्याच अफवा पसरल्या आहेत.
सोशल मीडियावर श्रेयसच्या निधनाच्या पोस्ट व्हायरल(death) झाल्या होत्या. अचानक त्याच्या निधनाचे मेसेज वाचून श्रेयसला मोठा धक्का बसला आहे. त्याने या सर्व चर्चेवर आता मौन सोडलं आहे. यावर श्रेयस चांगलाच भडकला असून त्याने सोशल मीडियावरील अशा नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. श्रेयसने याबाबत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.
“मी जिवंत, खुश आणि निरोगी आहे”, असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर ही भलीमोठी पोस्ट लिहित तो अफवांवर व्यक्त झाला आहे. श्रेयसची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.
“मी जिवंत आहे, आनंदी आहे व निरोगी आहे. माझ्या निधनाची माहिती देणाऱ्या एका व्हायरल पोस्टबद्दल मला कळालं. विनोद मी समजू शकतो, पण जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरा त्रास होतो. एखाद्याच्या विनोदातून सुरू झालेली गोष्ट आता अनावश्यक काळजी निर्माण करत आहे, तसेच माझ्यासाठी काळजी करणाऱ्या लोकांच्या, खासकरून माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ होत आहे.”
“माझी लहान मुलगी रोज शाळेत जाते, ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजीत आहे, ती सतत मला प्रश्न विचारत असते. या खोट्या बातमीमुळे तिची भीती आणखी वाढते आहे. तिला तिच्या शाळेत याबद्दल शिक्षकांकडून, वर्गमित्रांकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. तिला आम्ही कुटुंब म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करतोय,” असं श्रेयस म्हणाला.
“अशा पोस्ट करणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्यांनी हे थांबवावं आणि या पोस्टच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करावा. बऱ्याच लोकांनी माझ्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केलीये. लोकांच्या भावना दुखावण्यासाठी विनोदाचा वापर केला जातोय हे पाहून खूप वाईट वाटतंय. कारण या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ शकतात आणि आमच्या आयुष्यात व्यत्यय आणतात. जेव्हा तुम्ही अशा अफवा पसरवता तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नाही, तिच्या कुटुंबावरही परिणाम होतो. खासकरून लहान मुलं जे या गोष्टी समजू शकत नाही.”
“ज्यांनी माझी विचारपूस केली, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुमची काळजी आणि प्रेमच माझ्यासाठी सर्वकाही आही. ट्रोलर्सना, माझी एकच विनंती आहे की कृपया हे सगळं थांबवा. दुसऱ्यांवर असे विनोद करू नका. तुमच्याबरोबरही असं काही घडावं असं मला कधीच वाटणार नाही, त्यामुळे थोडे संवेदनशील व्हा,” अशी पोस्ट श्रेयसने केली आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :
ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव
बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
“तुमच्या दीड हजारांनी काहीही होणार नाही, आम्हाला लाडकी बहीण नको, न्याय द्या”, आंदोलक महिलेचा संताप!