झोपा कामावर आणि नोकरी गमवा? न्यायालयाचा ठोस निर्णय
तुम्ही ऑन ड्युटी डुलकी मारत असाल किंवा झोपा काढत (sleep)असाल तर सावधान. तुमची नोकरीही जाऊ शकते.कारण उच्च न्यायालयाने ऑन ड्युटी डुलकी मारणाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढलेत.नेमकं काय आहे हे प्रकरण? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. तुम्ही कामावर असताना अधून मधून डुलकी घेत असाल तर सावधान. कारण ऑन ड्युटी झोप घेणं हे गैरवर्तन असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय.त्यामुळे झोपाळूंचे धाबे दणाणले आहेत. ड्युटीवर झोप घेतल्याने कामावरून काढलेल्या कामगाराला पुन्हा कामावर घेण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता.. तो आदेश उच्च न्यायालयाने रद्द केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात.
‘असाही’ कंपनीच्या वाकड प्लांटमध्ये नदीम डोलारे वॉचमन म्हणून कामाला होता
27 ऑक्टोबर 2006
नाईट शिफ्टदरम्यान चेंजिंग रुममध्ये नदीम झोपल्याचं दिसून आलं
31 ऑगस्ट 2007
कंपनीने शिस्तभंगाची कारवाई करून(sleep)नदीमवर बडतर्फीची कारवाई केली
बडतर्फीच्या आदेशाला डोलारेने न्यायालयात आव्हान दिलं
शिस्तभंगाची कारवाई रद्द ठरवत थकीत वेतन देऊन नदीमला कामावर घेण्याचा कामगार न्यायालयाचा आदेश
उच्च न्यायालयाच्या संदीप मारणे यांच्या एकलपीठाकडून कामगार न्यायालयाचा निर्णय रद्द
ऑन ड्युटी डुलकी घेणं हे गैरवर्तन असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत.. मात्र हे असं असलं तरी कामगारावर कारवाई करताना त्याच्या सेवेचा रेकॉर्ड विचारात घ्यायला हवा, असा सल्लाही न्यायालयाने कंपनीला दिलाय..तर कंपनीने कामगाराला 22 लाख रुपये एकरकमी(sleep) देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या
राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?