तुमच्या घरातली चप्पल १ लाख रुपयांना स्लीपरची तुफान चर्चा video
आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, (market)त्यात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची स्लीपरही नक्कीच असेल. ही स्लीपर लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी घातली असेल आणि आजही काहींच्या घरांमध्ये दिसते. बाजारात फक्त १०० रुपयांत उपलब्ध असलेली ही साधी स्लीपर सध्या लाखो रुपयांत विकली जात आहे. हे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण हे खरे आहे. सोशल मीडियावर अशा स्लीपरची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे.
हा व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून कुवेतमधील आहे. सौदी अरेबियातील कुवेतमध्ये ही स्लीपर एका दुकानात लाखो रुपयांना विकली जात आहे. सौदी अरेबियातील पैशांनुसार या स्लीपरची किंमत ४,५०० रियाल आहे, म्हणजेच भारतात साधारण एक लाख रुपयांपेक्षा जास्त.
या स्लीपरला ‘ट्रेंडी सँडल’ असे नाव देण्यात आले आहे आणि किंमत ऐकून सर्वांचे लक्ष या स्लीपरकडे वेधले आहे. मात्र, स्लीपरची किंमत पाहिल्यावर (market)अनेकजण टीका करत असून, मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल व्हिडिओत ही स्लीपर कुवेतमधील एका दुकानात दिसत आहे. दुकानातील एक कर्मचारी या लाखो रुपयांच्या स्लीपरची वैशिष्ट्ये आणि किंमत सांगताना दिसत आहे.
We Indians use these sandals as a toilet footwear pic.twitter.com/7EtWY27tDT
— Rishi Bagree (@rishibagree) July 16, 2024
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपण भारतीय या सँडल्सचा वापर टॉयलेट फुटवेअर म्हणून करतो.” या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक गंमतशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. (market)एका यूजरने लिहिले आहे की, “ही स्लीपर आम्ही तर फक्त ६० रुपयांना विकत घेतो,” तर दुसऱ्याने लिहिले आहे, “आमच्या इकडे प्रत्येक घरोघरी अशी स्लीपर असते.”सोशल मीडियावर या साध्या स्लीपरची किंमत आणि तिच्याविषयी चर्चा जोर धरत असून, लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत.
हेही वाचा :
डायबिटीज रुग्णांसाठी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला: मध आणि गूळ सेवनाने ब्लड शुगर होईल कमी?
स्मृती मानधनाला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? नॅशनल क्रशने सांगितली ‘दिल की बात’
‘माझ्यासोबत विश्वासघात झाला’; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप!