रस्त्याच्या मधोमध साप-मुंगूस झाले युद्धात मग्न… Video Viral

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांसंबंधीचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. सध्या देखील असाच एक व्हिडिओ इथे व्हायरल(viral) झाला आहे. आता जेव्हा जेव्हा साप आणि मुंगूस समोरासमोर येतात तेव्हा ते स्थळ, वेळ आणि परिस्थितीचा अजिबात विचार करत नाहीत.

साप आणि मुंगूस समोरासमोर आले म्हणजे युद्ध अटळ आहे एवढे नक्की. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट आणखीनच पटू लागेल. साप आणि मुंगूसामधील लढत ही जरी एक सामान्य गोष्ट असली तरी याला पाहण्यासाठी रस्ता अडवणाऱ्या डझनभर लोकांचा घोळाखा लोकांना अधिक हादरवून गेला. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

व्हायरल(viral) व्हिडिओमध्ये साप आणि मुंगूस यांच्यात एक थरारक लढत होत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या या लढाईमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे देखील दिसून आले. कारण ट्रक आणि वाहनांव्यतिरिक्त बाइकवरून प्रवास करणारे लोकही तिथे आपली पार्क करून ही लढत पाहताना दिसले.

साप आपल्याला इजा करू शकतो या भीतीने कोणीही पुढे जाण्याची हिम्मत केली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल(viral) झाला असून लोक आता यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. साप-मुंगूसाच्या या लढतीत नक्की कोण कुणावर भारी पडतं? चला जाणून घेऊयात.

या व्हिडिओमध्ये साप आणि मुंगूस रस्त्याच्या मधोमध संघर्ष करताना दिसत आहेत. साप आणि मुंगूसचे हे लढण्याचे कौशल्य पाहण्यासाठी लोक आपली सर्व कामे आटोपतात. सुमारे 10 सेकंद साप आणि मुंगूस यांच्यात जोरदार झुंज सुरू राहते. ज्यामध्ये साप आणि मुंगूस एकमेकांशी नक्कीच भांडतात.

पण एवढी गर्दी पाहून मुंगूस पळून जाण्याच्या तयारीत आहे. पण वेळोवेळी त्याला सापाशी असलेले त्याचे जुने वैर आठवते. यामुळे तो पुन्हा त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. अवघ्या काही सेकंदाच्या या लढतीत शेवटी मुंगूस तेथून पळून जाताना दिसून येतो.

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @pathfinder2016 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रस्त्याच्या मधोमध सापाशी मुंगूसची लढाई ‘ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शो पाहणे ही आपल्या भारतात एक सवय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटलं मनुष्य च असा वागतो पण ईथे तर सरपटणारे प्राणी सुद्धा माणसाच्या दोन पावलं पुढे आहेत इतकी गर्दी असताना सुद्धा आपल्या भांडणात मग्न आहेत”.

हेही वाचा :

अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल 

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओनियन चीझ टोस्ट

सध्याच्या परिस्थितीवर शरद पवारांनी केलं मोठं विधान; म्हणाले, ‘राज्यात एकप्रकारे…’