‘…म्हणून लहान मुलांमधील राग वाढतोय’; पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

आजकाल लहान मुलांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मुले रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांच्या रागावर(anger) नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

पालकांनी मुलांना चिडवणे, रागावणे किंवा मारहाण करणे टाळावे, कारण याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी, मुलांच्या रागाची(anger) कारणे समजून घेऊन, त्यांच्याशी प्रेमाने बोलून शांत करण्याचा प्रयत्न करावा. तसेच, मुलांसोबत पुरेसा वेळ घालवावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
मुलांमध्ये राग वाढण्याची कारणे:
ऑनलाइन गेम्स : हल्ली मुले मोकळ्या वातावरणात आणि मित्रांसोबत बाहेर खेळण्याऐवजी ऑनलाइन गेम्स खेळण्याला प्राधान्य देतात.
वाढलेला स्क्रीन टाइम : मुलांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाइम आणि टीव्ही-मोबाइलवर पाहिलेल्या घातक दृश्यांमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो.
एकटेपणा: सतत नकारात्मक गोष्टी बघणे आणि एकटे राहणे, यांमुळे मुले रागीट आणि एकलकोंडी होतात.
मुलांच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक तयार करा. ज्यामुळे गोष्टी स्थिर राहिल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. लहान मुले पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी स्वतःचे वेळोवेळी निरीक्षण करणे आवश्यक आहे. आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या काळात पालकांनी मुलांना संयमाचे महत्त्व शिकवणे गरजेचे आहे. मुले मोबाईलवर काय बघतात, याकडे लक्ष द्यावे. अधिक चिडचिडेपणा, राग येत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून तातडीने उपचार घ्यावा.
मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतात?
-मुलांच्या रागाला वाईट वागणुकीचे लेबल लावू नका. त्यांना सतत व्यस्त ठेवा.
-घरातील वातावरणाचा मुलांवर प्रभाव पडतो. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असावे.
-आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा.
-मुलांच्या रागामागील कारणांचा शोध घ्यावा.
-लहान मुलांवर हात उगारणे, त्यांना चिडवणे टाळावे.
-मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे.
लहान मुले अनुकरणातून व निरीक्षणातून शिकत असतात. त्यामुळे मुलांचा राग नियंत्रणात ठेवायचा असेल आणि चिडचिड कमी करायची असेल, तर घरातील ज्येष्ठांनी आणि पालकांनी आपली वागणूक कशी आहे, यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा :
मारुतीची 8 सीटर कार, भन्नाट फिचर्स, दमदार इंजिन अन् डिस्काउंट तब्बल 3.15 लाखांचा
देवेंद्र फडणवीसांचा पहिला धक्का; राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेंना वगळलं
आपच्या पराभवानंतर महाविकास आघाडी अलर्टवर; महापालिका निवडणुकांसाठी होणार फेरविचार