… तर फडणवीस राजकारणातून निवृत्त होणार? पदाचा राजीनामा देणार
गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या(politics) मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलच खवळलं आहे. अशातच आता मराठा आंदोलक सर्वच राजकीय मंडळींना मराठा आरक्षणाबाबतचा खडसून जाब विचारत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती व महाविकास आघाडी काय भूमिका असा थेट प्रश्न देखील विचारला जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विधानसभा(politics) निवडणुकांची तयारी सुरू असून ते महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल केला जात आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटलांनी सडकून टीका केली, तसेच ते सतत गंभीर आरोप देखील करताना दिसून येतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काम करुन इच्छितात पण देवेंद्र फडणवीस त्यांना हे काम करु देत नाहीत असा गंभीर आरोप आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता, मनोज जरांगेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक शब्दात उत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटलांना रोखठोक शब्दात उत्तर दिल आहे. मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण हे देखील मला यानिमित्ताने सांगितलं पाहिजे की, राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी काम करतात. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ देखील माझं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर म्हणाले की, मराठा आरक्षणाकरिता कोणताही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी जर थांबवला, तर त्या क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन.
हेही वाचा :
35 वर्षांनी ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार
PL 2025 आधी BCCI ने ‘हा’ नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा
येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा