म्हणून मविआ आमदारांनी घेतली शपथ नाकारली आदित्य ठाकरेंनी दिले कारण
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. (speaker)त्यानंतर 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र आजपासून विशेष अधिवेशनाला सुरवात झाली आहे. या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी या आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे शपथ देणार आहेत.मात्र आज अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही. कारण विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी अटीतटीची लढत झाली. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाली.
दरम्यान, निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मात्र आजपासून याचेच पडसाद विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात देखील उमटले आहेत. कारण आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन देखील करण्यात आलं आहे.यासंदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (speaker)राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अद्यापही संशय व्यक्त केला जात आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीच्या निकालानंतर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. परंतु, पोलिसांकडून विरोध झाल्यानंतर हे मॉक पोलिंग मागे घेण्यात आले.
अशातच याप्रकरणी आज विधिमंडळ परिसरात माविआच्या नेत्यांकडून भूमिका देखील मांडण्यात आली. परंतु एखादं सरकार एवढ्या मतांनी निवडून येतं त्यावेळी जल्लोष पाहायला मिळतो. मात्र राज्यात जल्लोष दिसत नाही. त्यामुळेच राज्यात ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आम्ही(speaker)आज शपथ घेतली नाही. मात्र उद्या आम्ही शपथ घेणार आहोत असं आदित्य आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा :
विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात:नवनिर्वाचित आमदार घेणार शपथ
IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला
राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी