…म्हणून पुरुषांना लांब केस असलेल्या स्त्रिया आवडतात

पूर्वीच्या काळात स्त्रियांचे लांब आणि दाट केस हे केवळ सौंदर्य नव्हे, तर चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जात. अनेक संशोधनांनुसार, लांब केस(long hair) हे चांगल्या पोषण, प्रजननक्षमता आणि निरोगी जीवनशैलीचे लक्षण असते. पुरुषांच्या दृष्टीने हे गुण आकर्षक वाटतात.

महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन अधिक प्रमाणात असल्याने त्यांचे केस पुरुषांच्या तुलनेत अधिक लांब आणि दाट होतात. नैसर्गिकरित्या, पुरुषांना अशा वैशिष्ट्यांकडे आकर्षण वाटते. यामुळेच लांब केस(long hair) असलेल्या महिलांकडे पुरुष सहज आकर्षित होतात.

भारतीय संस्कृतीत लांब केस स्त्रीत्व आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जातात. पारंपरिक कथा, चित्रपट आणि कलांमध्ये सुंदर स्त्री ही बहुतेक वेळा लांब केसांसहच दर्शवली जाते. त्यामुळे लांब केस ही सौंदर्याची संकल्पना आपल्या मानसिकतेत रुजलेली आहे.

लांब केस अनेकदा लैंगिक आकर्षणाचे लक्षण मानले जातात. महिलांचे केस फिरवणे, केस बाजूला सारणे यांसारख्या हालचाली फ्लर्ट करण्याच्या नैसर्गिक पद्धती मानल्या जातात. संशोधनानुसार, पुरुषांना लांब केस असलेल्या महिला तरुण आणि प्रजननक्षम वाटतात.

२००४ मध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळले की, लांब केस असलेल्या महिला पुरुषांना अधिक आकर्षक वाटतात. कारण हे केस तारुण्य, आरोग्य आणि सौंदर्याचे संकेत देतात. लांब केस हे केवळ सौंदर्याचे नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक संकेतांचेही प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचा :

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा अपघातात मृत्यू

खेळताना एक वॉशिंग मशीनमध्ये चढला दुसऱ्याने प्लग ऑन केला अन्…; पुढे जे घडलं भयंकर, Video Viral

एसटी बसचालक-वाहकांची मद्यप्राशन तपासणी; अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय