…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (political topics)यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संपादक योगेश कुटे यांनी साधलेल्या संवादादरम्यान पवारांनी सांगितले की, पुर्ण बहुमतात नसलेल्या भाजप सरकारला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासारख्या सहयोगी पक्षांच्या वाढत्या मागण्यांमुळे अडचणी येऊ शकतात.
पवार म्हणाले, “मोदींना केवळ दोन राज्य नाही तर देश सांभाळायचा आहे. त्यामुळे या सरकारच्या(political topics) कालावधीवर परिणाम होऊ शकेल. ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील का हा प्रश्नच आहे.” त्यांच्या मते, पुन्हा निवडणुका घेणे आणि त्यासाठीचा खर्च टाळण्यासाठी खासदार पुन्हा निवडणुका नको असल्याचे दिसते. तथापि, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वाढत्या मागण्या केंद्र सरकारसाठी अडचणीचे ठरू शकतात.
“या मागण्यांचं स्वरुप इतकं मोठं असेल की केंद्र सरकारच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे त्यांची मागण्यांची भूक ते जोपर्यंत भागवताहेत तोपर्यंत या सरकारला अडचण नाही,” असे पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, “मोदींना दोनच राज्यांपुरती अनुकूल भूमिका घेऊन चालणार नाही. देश बघायला पाहिजे आणि जर ते होत नसेल तर स्वच्छ भूमिका घेण्याची त्यांची तयारी राहिली तर कदाचित या सरकारच्या कालावधीवर परिणाम होऊ शकेल.”
शरद पवारांनी नमूद केले की, मोदींच्या धोरणात विरोधकांबद्दलचा दृष्टीकोन अधिक प्रखर झाला असून, मित्र पक्षांबद्दल अतिशय विनम्रता दिसते. हे धोरण जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत सरकारला अडचण येणार नाही. पवारांच्या या विधानाने आगामी काळात भाजप सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सोनाक्षी सिन्हाने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, लग्नानंतर सांगितलं मोठं सत्य
अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की,’ ‘धर्मवीर २’चा दमदार टीझर रिलीज