‘तर विधानसभेला घरी बसतील…’; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

वडीगोद्री : सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे, गुन्हे वापस घेणे, आदी मागणी साठी मनोज जरांगे (government)अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असून रविवार ता.9 रोजी त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या वेळी पत्रकार परिषद मध्ये जरांगे यांनी सांगितले की, सरकारला चर्चा करण्यासाठी दार खुले आहे, अद्याप सरकार कडून संपर्क झाला नाही सरकारची काय भावना आहे हे मला माहित नाही. मोदी सरकार रविवार शपथ घेत आहे. या बाबत विचारले असता जरांगे यांनी सांगितले की, त्यांनी गरिबांसाठी काम करावं श्रीमंतासाठी काम करणं बंद कराव तरच त्यांना शुभेच्छा.

बीड जिल्हातील अश्लील स्टेटस बाबत बोलताना कोणाची बदनामी(government)करू नका, वाईट स्टेटस ठेऊ नका, शांतता राखा, असे अवहान जरांगे यांनी केले. निवडणुकी आधी देखील मी हेच सांगितलं होतं एखाद्याने टाकलं असेल म्हणजे समाजाने टाकले असे नाही, सरकारकडून सध्या कोणतीही हालचाल नाही ,सरकारची भावना मला माहित नाही, लढणं माझं काम आहे. सरकार मुद्दामहून दुर्लक्ष करत असेल, आम्हाला भेटायला कधी यायचं हे सरकार ठरवेल. असंच ते करत राहिले तर विधानसभेला घरी बसतील असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.

सध्या शेतीची कामे करा, अंतरवाली सराटी येथे येऊ नका मी येथे लढण्यासाठी खंबीर आहे. सरकारला चर्चेसाठी येण्यास वेळ नसेल तर त्यांनी मुंबई मधुन निर्णय घ्यावा अंबड च्या प्रभारी तहसीलदार यांच्याकडे मी माझ्या मागण्यांवर ठाम असल्याचे त्यांना सांगितलं आहे.

मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण झाली, गेवराई, बीड, रायमोह, माजलगाव, आदी ठिकाणी जातीयवादाच्या नावाखाली हाणामारी सुरू आहे. गृहमंत्री आणि बिडच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनांना आवर घालावा, खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजला त्रास देऊ नका मराठा समाजाने शांत राहावे, नरड्याला लागेपर्यंत सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही, मराठ्यांच्या मुलांनी शांत राहावे. नेकनूरला पिरावर चादर चढवली आहे, मला हिंदू धर्माचा गर्व आहे. मुस्लिम बांधवांना त्यांच्या धर्माचा अभिमान असावा, मी कट्टर हिंदू पण औरंगजेबाच्या कबरेवर ही चादर चढवली असा व्हिडीओ व्हायरल केला जातोय हे चुकीचं आहे.

सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं राजकारण हा आमचा मार्ग नाही. पण नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. रविवार ता.9 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापुरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल शिनगांरे, डॉ. संतोष मुंजाळ, समुदाय आरोग्य अधिकारी कैलास वराडे यांनी जरांगे यांची आरोग्य तपासणी केली.

हेही वाचा :

एआयमुळे मानवाचं अस्तित्त्व संपणार? कंपन्या तुम्हाला ठेवताहेत धोक्यात

पिझ्झा खाऊन होऊ शकतो घात, ११ वर्षीय मुलीचा पिझ्झा खाऊन मृत्यू

Ind v Pak मॅचआधी भारतीयांची आफ्रिदीबरोबर सेटींग? Video Viral