…म्हणून न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना ठोठावला दंड

शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट संघर्ष (supreme court)टोकाला गेला आहे. आरे ला कारेची भाषा, एकमेकांवरील टीकेची पातळी खालावत चालली आहे. दोन्ही गटांकडून डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तर भाजपसह शिंदे गटावर तुटुन पडतात. पण आता याच दोन्ही बड्या नेत्यांना न्यायालयाने दणका दिला आहे. तसेच दंडही ठोठावला आहे.

मुंबई सत्र विशेष न्यायालयाने बुधवारी (ता.1) माजी मुख्यमंत्री व शिवसेना(supreme court) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना एकत्रित दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हा दंड मानहानी खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी ठोठावण्यात आला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)‘सामना’या मुखपत्राच्या मराठी आणि हिंदी आवृत्तीत बदनामीकारक लेख छापल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच ‘सामना’वर कारवाई केली जावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

माजी खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोन्ही नेत्यांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज सादर केला होता.

अधिवक्ता मनोज पिंगळे यांच्यामार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात 2,000 रुपये जमा करण्यास झालेला विलंब अनावधानाने होता हे स्पष्ट करतानाच,अनेक कारणे नमूद करण्यात आली होती.

हेही वाचा:

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, खळबळजनक घटना

चोरी करायला गेला, प्रवाशांच्या हातात सापडला चोराचा कार्यक्रम केला VIDEO

बिग बॉसच्या घरात रोमँसचा माहोलअरबाजने निक्कीसाठी टॉमेटोपासून बनवलं दिल