… तर त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत; राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(political campaign) यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला उपस्थित राहून संबोधित केलं होत. यावेळी मराठी साहित्य परिषदेच्या बोधचिन्हाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी या मराठी साहित्य परिषदेला संबोधित करताना त्यांनी आजच्या साहित्यिक आणि कवींवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यांवर देखील टीका केली.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, आपलं मराठी साहित्य वाढवण्यासाठी आम्ही आहोत. हे मी माझ्या वतीने नक्की सांगू शकतो. परंतु या मराठी साहित्य संमेलनात मला ऐकायला बोलवावं, पण बोलायला बोलवू नये अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

तसेच राज ठाकरे (political campaign)पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील साहित्यिक कवी आतापर्यंत मी पाहत आलो आहे. त्यामुळे मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात, मनात रुजलेला असायचा आणि योग्यवेळी त्यांनी हे ठणकावून देखील सांगितले पाहिजे. तसेच राज्यातील राजकारण्यांना बिघडलेल्या सांस्कृतिक बाबींना सांगण्याची हिंमत, धमक होती, परंतु आज ती आज कमी दिसत आहे, असं निश्चितच मला वाटतंय आहे अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे. आजच्या महाराष्ट्राचा खेळ तसेच सर्कस झाली आहे. कारण कोणी विदुषकी चाळे करतं आहे तर कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या मारतं आहे. परंतु खरंतर महाराष्ट्रातील राजकारणात असे काही लोक आहेत त्यांना मात्र जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत. कारण राज्याच्या राजकारणात कशाही प्रकारची भाषा वापरली जात आहे.

याशिवाय राज्यात अशा काही गोष्टी घडत आहेत तिथं त्यांचे कान धरून शिकवणं आणि त्यांना समजावणं हे तुमचं सर्वांत मोठं कर्तव्य आहे, असं मी मानत आहे. तसेच ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिलीत, मुलाखती दिल्यात, त्यावर सोशल मीडियावर काय चर्चा सुरु आहे हे मी कधीच पाहतच नाही. कारण माझं बोलून झालंय ना. मग आता विषय संपला असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा :

बाप रे! तरूणाचा चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका…Video

सांगलीमधील बैठकीत संजयकाका पाटील अन् विशाल पाटील यांच्यात जोरदार राडा

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viral