भर रस्त्यात चोरांनी दागिने पळवताना महिलेसोबत घडलं असं काही…; घटनेचा VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर(Social media) रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा मेजशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट, भांडण यांशिवाय अनेक सत्य घटनांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी अपघातांचे तर कधी चोरीचे. सध्या चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेक लोकांसोबत अपघात देखील झाले आहेत.
तुम्ही या चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social media) पाहिले देखील असतील. अनेकदा या अपघातांचे व्हिडिओ इतके थरारक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही चोरांनी महिलेचे दागिने पळवून नेले आहेत. मात्र, या प्रयत्नात महिलेसोबत असे काही घडले आहे की, पाहूण थरकाप उडेल. हा व्हिडिओ लखनऊमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्य़े तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. तसेच इतरलोकही तिथून जात आहेत अनेक गाड्या देखील ये-जा करत आहेत. त्याच वेळी दोन तरुण मागून बाईकवर येतात. मागे बसलेला धावत्या बाईकवरुनच तरुण महिलेच्या हातातील पर्स ओढतो आणि दोघे जोरात बाईकवर पळून जातात. यावेळी ती महिला देखील त्या बाईकसोबत फरपटत जाते. ती जोरात उडून आदळते. ही संपूर्ण घटना तिथे जवळच असलेल्या एक सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून थरकाप उडाला असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्या महिलेला काही झाले नाही ना? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ती किती जोरात आदळली तिला नक्कीच लागले असणार आहे.
तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, याची तक्रार केली आहे का? मात्र, या घटनेची तक्रार झाली की नाही, किंवा या महिलेला तिची पर्स मिळाली की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच ही घटना कधीची आहे हे अद्याप कळालेले नाही. याशिवाय या घटनांचे प्रमाण वाढतच आहे.
हेही वाचा :
नागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार
इंग्रजीची स्पेलिंग चुकली म्हणून शिक्षिकेने दुसरीतील विद्यार्थ्याच्या पाठ, पायावर…
प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच गर्भपातही केला अन् नंतर…