भररस्त्यात तरूणाने रूसलेल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी केले असं काही…Video

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल हात असते. अनेकदा असे व्हिडीओ(video) व्हायरल होतात जे पाहून आश्चर्याच्या धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडीओ पाहतो जे पाहून हसू आवरता येत नाही. कपल्सचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी प्रपोज केलेल्याचे. गर्लफ्रेंड नाराज झाल्यावर तिला मनवतानाचे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रेमाचे नाते हे अगदी जिव्हाळ्याचे असते. मग ते आपल्या आईसोबत, बाबांसोबत असो वा बहिणीसोबत. पण प्रियकर आणि प्रियसीचे नाते काही वेगळं असते. एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचे वचन असते. अनेकदा प्रियकर-प्रियसीमध्ये कोणत्या गोष्टींवरून वाद झाल्यास ते एकमेकांना मनवतात. सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला मनवण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये(video) तुम्ही पाहू शकता की, एका मुलाने रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली आहे. तिथे त्याची गर्लफ्रेंड उभी असलेले दिसत आहे. त्याने तिच्या पायाला पकडून रसत्यावरच तो खाली बसला आहे. तो तिला कोणत्या तरी गोष्टीवरून मनवण्याचा प्रयत्न करत आहे. ती त्याच्यावर आणखी नाराज होऊन त्याला सोड म्हणून सांगत आहे. मुलाला असे करताना पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले पण काही वेळाने सर्वजण स्माईल करू लागले. त्या मुलीला देखील हसू आले आणि तिला हसातान पाहून तिचा प्रियकरही खूश झाला. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर romiyo_bagdi_ अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडत आहे. विशेषत: प्रेमींसाठी हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. एका युजरने म्हटले आहे की, याला बोलतात खरे प्रेम, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तो तिला मनवल्याशिवाय राहणार नाही, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, मुलांनो बघा, गर्लफ्रेंड रूसल्यावर तिला कसे मनवायचे. तर अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला प्रेम असे कॅप्शन देण्यात आले आहे.

हेही वाचा:

‘या’ तीन राशींना सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार बक्कळ पैसा!

संग्राम चौगुले बिग बॉस घरातून बाहेर! बिग बॉसला प्रेक्षकांनी केलं ट्रोल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही तृप्ती डिमरीची भुरळ? धनुषसोबत करणार रोमान्स