वडील बदनामी करत असल्याचा मुलाला आला राग; लोखंडी बत्त्याने केला जन्मदात्याचा खून
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात क्षुल्लक कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे होताना दिसत आहेत. त्यात आपलेच वडील(daddy) आपलीच गावात बदनामी करत असल्याच्या रागातून मुलाने वडिलाची हत्या केल्याची घटना येवदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुयरी नागे व त्यांचे पती वडीलांच्या(daddy) गावी भामोद येथे पोहोचले. घरात वडील रामकृष्ण सदाशिव कात्रे (वय 60, रा. भामोद) हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत दिसले. त्यामुळे वडिलांचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती येवदा पोलिसांना दिली.
दर्यापूर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, येवदा पोलिस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. चौकशीत रामकृष्ण सदाशिव कात्रे यांना तीन मुली व एक मुलगा असून, पत्नीचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुलगा अतुल व त्याची पत्नी हे सांभाळ करत नसल्याचे रामकृष्ण हे नेहमी गावात नातेवाईकांना सांगत होते. या गोष्टीचा राग मनात धरून अतुलने वडिल रामकृष्ण यांना घरी आणले. त्या दिवशी तो शेतावरुन परत आला. त्याने वडिलांना बदनामीबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रामकृष्ण व अतुल यांच्यात वाद झाला.
अतुलचा राग अनावर झाला. त्याने लोखंडी बत्याने वडीलांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांचा खून केला. सदर घटनेबाबत काहीच माहिती नसल्याचा बनाव त्यांनी केला होता. ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. पुढील तपास येवदा पोलिस करत आहे.
हेही वाचा :
मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त
दिवाळीनंतर शनीची सरळ चाल, 2025 पर्यंत ‘या’ राशींचा सुरु होणार ‘गोल्डन टाईम
दोनदा घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर