शेअर ​बाजार उघडताच खरेदीला उधाण​, सेन्सेक्स आणि निफ्टी सुसाट…मोडले सर्व विक्रम!

अर्थसंकल्पाच्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजाराने मागील आठवड्यात (stock market)प्रॉफिट बुकिंग केली तर २६ जुलै रोजी नवीन बंद उच्चांक नोंदवला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार एक टक्क्यांनी वधारला असून आता सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, शेअर मार्केटची पॉझिटिव्ह ओपनिंग झाल्याचे दिसून आले आणि बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजीची हिरवळ पसरल्याचे दिसून आले.

देशांतर्गत स्टॉक मार्केट(stock market) गेल्या आठवड्यात शुक्रवारी, ८०,१५८.५ अंकांवर बंद झाला तर सोमवारी सकारात्मक सुरुवातीसह ओपनिंग केली. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी बाजार उघडताच सेन्सेक्सने ८१,६७९ अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर निफ्टी २५ हजारांच्या दिशेने अग्रेसर असून २४,९४३ ऑल-टाइम उच्चांकावर ओपनिंग केली. सध्या सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांच्या वाढीसह ८१,६५४० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, निफ्टी देखील १०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून २४,९५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी २४ वधारले असून सहा स्टॉकमध्ये पडझड नोंदवली गेली तर निफ्टीच्या ५० पैकी ४८ तेजीत तर केवळ दोन स्टॉक घसरत आहेत.

निफ्टीवरील सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान श्रीराम फायनान्स, डिव्हिस लॅब्स, अपोलो हॉस्पिटल्स, भारती एअरटेल आणि सिप्ला शेअर्स टॉप गेनर्स ठरले तर ओएनजीसी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि नेस्ले इंडियामुळे गुंतवणूकदारांना फटका सहन करावा लागत आहे.

देशांतर्गत बाजारात सध्या तिमाही निकालाचे सत्र सुरू असून सोमवारीही अनेक मोठ्या कंपन्या जून तिमाहीचे निकाल जाहीर करतील. नवीन सुरुवातीच्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, ITC, टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स, टायटन कंपनी, कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज या महत्त्वाच्या कंपन्या आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जारी करतील.

याशिवाय आठवडाभर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, गेल इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, इंडस टॉवर्स, ACC, अंबुजा सिमेंट्स, झोमॅटो, भेल, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, डाबर इंडिया, इमामी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोलगेट पामोलिव्ह, CSB बँक, इंडियन बँक, क्वेस कॉर्प, डिक्सन टेक्नॉलॉजीज, एक्साइड इंडस्ट्रीज, जिंदाल स्टेनलेस, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, टोरेंट पॉवर, वरुण बेव्हरेजेस, गोदरेज प्रॉपर्टीज, मॅनकाइंड फार्मा, झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस, एस्कॉर्ट कुबोटा, एलआयसी हाउसिंग फायनान्स, यूपीएल आणि अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी देखील तिमाहीतील कामगिरी जारी करतील.

त्याचवेळी, जागतिक आघाडीवर चालू आठवड्यात फेड ओपन मार्केट कमिटीसह मध्यवर्ती बँकांच्या बैठकींवर सर्वांचे लक्ष लागून असेल. फेडरल रिझर्व्ह ३१ जुलैच्या बैठकीत निधी दरात कपात करण्याची शक्यता नाही पण फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या टिप्पण्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

हेही वाचा :

बकरीच्या नावाखाली कुत्र्यांच्या मांसाची विक्री? 2700 किलो मांस जप्त

रात्री आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या असं करणं योग्य !

भाजपाची 288 जागांवर लढण्याची तयारी: चंद्रकांत पाटील यांचं महत्त्वपूर्ण विधान