सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
संपूर्ण महाराष्ट्राला ‘गुलीगत धोका’ या डायलॉगने हसवणारा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये प्रचंड गाजला. त्याचा नुकताच एक चित्रपट(film) देखील प्रदर्शित झाला आहे. बिग बॉसमधील यशानंतर सुरज थेट ‘राजा राणी’ या चित्रपटात झळकला. मात्र, आता याच चित्रपटामुळे सुरज हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
‘राजा राणी’ हा चित्रपट(film) समाजासाठी घातक असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकंच नाही तर, हा चित्रपट बंद करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे. प्रसिद्ध ॲड. वाजिद खान यांनी चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठावून कायदेशीररित्या बंदी घातली जाईल, असा इशारा दिला आहे.
सुरज चव्हाण हा राज्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. राजा राणी हा त्याचा चित्रपट पाहुन अनेक तरुण तरुणी आत्महत्या करु शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. या चित्रपटाच्या शेवटी समाज व नातेवाईकांमुळे दोन प्रेमी एकत्र होवू शकत नाहीत, म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करतात. यातून चुकीचा संदेश देण्यात आल्याचा आरोप देखील वाजिद खान यांनी केला आहे.
सुरज आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणी करू शकतात. यामुळे आत्महत्या वाढण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही, त्यामुळे राजा राणी हा चित्रपट बॅन करण्यात यावा अशी मागणी वाजिद खान यांनी केली आहे.
दरम्यान, ‘राजा राणी’ या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील, अभिनेत्री वैष्णवी शिंदे तसेच सुरज चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर, चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.
या चित्रपटातील ‘थोडासा भाव देना’हे गाणं चांगलंच गाजत आहे. या गाण्यात रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावत आहे. तर या गाण्यात आपल्या मित्राला प्रेमामध्ये पाठिंबा देताना ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाण आणि सैराट फेम तानाजी गलगुंडे दिसत आहे.मात्र, आता या चित्रपटावर बंदीची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत
एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले मोठे अपडेट्स
मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर