सौरव गांगुलीची पोलिसात धाव, दाखल केला मानहानीचा खटला
भारताचा माजी क्रिकेटर (cricket)सौरव गांगुली विविध गोष्टींमुळे चर्चेत येत असतो. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकरणी भारताच्या माजी खेळाडूने थेट कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.
महिलेला न्याय मिळावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी देशभरात ठिकठिकाणी निदर्शन केली जात होती. परंतु या बलात्कार प्रकरणावर सौरव गांगुली(cricket) त्याच्या एका वक्तव्यामुळे ट्रोल झाला. त्यानंतर गांगुलीने आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून बलात्कार पीडितेला न्याय मिळावा म्हणून त्याने पत्नीसह रस्त्यावर उतरून मोर्चा देखील काढला होता. मात्र यानंतरही गांगुलीचं ट्रोलिंग काही कमी झालं नाही.
गांगुलीने बलात्कार प्रकरणाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर इतर लोकांप्रमाणेच यूट्यूबर मृण्मय दास (सिनेबॅप) याने एक व्हिडीओ बनवून सौरववर टीका करत हल्लाबोल केला. आता या विरोधात सौरव गांगुलीने कोलकाता पोलिसांच्या सायबर क्राईम विंगकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत गांगुलीने म्हटले की त्याला धमकावण्यात येत आहे. सायबर सेलकडे करण्यात आलेल्या तक्रारीत गांगुलीने यूट्यूबर विरुद्ध सायबरबुलिंग आणि मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. ही तक्रार सौरव गांगुलीची सचिव तानिया भट्टाचार्य हिच्या द्वारे दाखल करण्यात आली आहे.
माजी क्रिकेटर आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची सेक्रेटरी तानिया भट्टाचार्य हिने इमेल द्वारे कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली. त्यात लिहिले होते की, ‘मी मृण्मय दास नावाच्या व्यक्तीचा समावेश असलेल्या सायबर बुलिंग आणि बदनामीच्या प्रकरणाकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी हा ईमेल लिहित आहे.
या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात सौरव गांगुलीला लक्ष्य केले आहे, त्याच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली आहे आणि अपमानास्पद टिप्पण्या केल्या आहेत, जे त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही’. सदर तक्रारीत गांगुलीने या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. मृण्मय दास याने बदनामी आणि धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही गांगुलीने सांगितले आहे.
सौरव गांगुली हा भारताचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष देखील राहिला आहे. सौरव गांगुलीने 113 टेस्ट सामन्यात 7212 धावा, 311 वनडेत 11363 धावा केल्या. तसेच सौरवने 59 आयपीएल सामने सुद्धा खेळले असून यात 1349 धावा केल्या आहेत. सध्या सौरव गांगुली हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या टीमचा मेंटॉर आहे.
हेही वाचा:
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु
‘वन नेशन वन इलेक्शन’वरुन विरोधक आक्रमक
बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार