मविआत वादाची ठिणगी: अमोल कोल्हेंचा काँग्रेस-शिवसेनेवर हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारूण पराभव झाला तर (Mahavikas Aghadi)महाविकास आघाडीचा भरघोस होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले.
तर (Mahavikas Aghadi)महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यानंतर महाविकास आघाडातील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मविआला टोला लगावला. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असे म्हणत त्यांनी मविआला घरचा आहेर दिला. यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मविआतील मित्रपक्षांना टोला लगावलाय.
खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना जोरदार टोला लगावलाय. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही.
राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत.
लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे, असे त्यांनी म्हटले आहे. आता अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडी विधानसभेत एकत्रित सामोरे गेली. मात्र विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता महाविकास आघाडी दुरावा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीमध्ये सुरू आहे.
उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षातील नेते आपण एकला चलो रेची भूमिका घ्यावी, अशी विनंती करत असल्याची माहिती मिळत आहे. तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपल्याला फटका बसलेला आहे, अशी ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांची भावना असल्याचेही समजते. तर दुसरीकडे काँग्रेसच्याही बैठका सुरु आहेत.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय. तर तिसरीकडे अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्रित निवडणूक लढवणार की स्वतंत्र मैदानात उतरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
शालेय साहित्यासाठी पैसा नव्हता; मुलाच्या आत्महत्येनंतर बापानेही संपवले जीवन
अति घाई संकटात नेई! घाईघाईत महिला रेल्वे रुळावर पडली इतक्यात… VIDEO
जयंत पाटील 8 दिवसात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार