“स्क्विड गेम 2” मधील अभिनेत्रीचं निधन; चाहत्यांना मोठा धक्का
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. नेटफ्लिक्सवरील जगप्रसिद्ध सिरिज “स्क्विड गेम 2” मधील अभिनेत्री(actress) ली जू सिल यांचे पोटाच्या कर्करोगाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे चाहते आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
“स्क्विड गेम 2” मधील भूमिका आणि कर्करोगाशी झुंज
“स्क्विड गेम 2” मध्ये ली जू सिल यांनी (actress)वाई हा जूनच्या ह्वांग जून होची आई पार्क माल सूनची भूमिका साकारली होती. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
ली जू सिल यांना पोटाचा कर्करोग तर होताच, शिवाय काही वर्षांपूर्वी त्यांना स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर देखील झाला होता. त्यातून त्या बऱ्या झाल्या आणि त्यांनी कर्करोगावर यशस्वी मातही केली होती. मात्र, पोटाच्या कर्करोगाने त्यांचा घात केला.
डॉक्टरांनी आधीच दिला होता इशारा
ब्रेस्ट कॅन्सरवर मात केल्यानंतर डॉक्टरांनी ली जू सिल यांना सांगितले होते की, आता त्यांच्याकडे जास्त वेळ नाही.
चाहत्यांना मोठा धक्का
ली जू सिल यांच्या निधनामुळे दक्षिण कोरियातील चित्रपटसृष्टीपासून ते भारतीय चाहत्यांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या “स्क्विड गेम 2” मधील भूमिकेसाठी आणि कर्करोगाशी दिलेल्या झुंजार लढासाठी त्या चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील.
हेही वाचा :
महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात, पंचांशी हुज्जत घालणं भोवलं
जगात लवकरच काहीतरी भयंकर घडणार… डोनाल्ड ट्रम्प यांनी केले मोठे वक्तव्य
जीव दिला की जीवानीशी मारले? medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह